विदर्भाची खासियत...अंबाडीची भाकरी

    दिनांक :16-Sep-2022
|
Ambadi श्रावणानंतर आता पितृपक्ष सुरु आहे, पितरांना आदरांजली द्यायचा पंधरवाडा... आणि ह्या नंतर सुरु होतंय शारदीय नवरात्र, आई जगदंबेचे नवरात्र... शारदेय म्हणजे शरद ऋतू प्रारंभ होतो... थंड वाऱ्याची झुळूक... आणि अशा वातावरणात खावेशे वाटतात गरमा-गरम भाकरी.... त्या वर मऊसूद लोणी, आणि बाजूला हिरव्यागार मिरचीचा ठेचा. आणि विदर्भात खास अशी बनते अंबाडीची भाकरी. 
 

ambadi  
Ambadi  अहाहा...खावीशी वाटतेय ... करू पाहावीशी वाटतेय विदर्भात खास अशी अंबाडीची भाकरी ...चला मग बनवूया झटपट अंबाडीची भाकरी...
साहित्य- अंबाडीच्या भाजीची १ जुडी, ज्वारीचे पीठ, मीठ, जिरे, आवडत असेल तर लाल तिखट.
 
कृती -
१) Ambadi प्रथम अंबाडीची भाजी स्वच्छ धुवून, चिरून घ्यावी, एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात चिरलेली भाजी घालून उकडून घ्यावी..
२)Ambadi थोडीशी थंड झाल्यावर परातीत ज्वारीचे पीठ, चवीपुरते मीठ, जिरे.. आवडीप्रमाणे ओवा देखील घालता येतो त्यामध्ये उकडलेली अंबाडी टाकावी.
 
३)Ambadi पीठ एकत्र करून चांगले मळुन घ्यावे.पाणी लागलेच तर अंबाडी उकडलेले पाणीच घ्यावे. या पीठाच्या भाकरी थापुन खरपुस भाजाव्यात .
 
४)Ambadi सोबत एखादी खोबरे शेंगदाण्याची चटणी दह्यात कालवून घ्यावी.. ही भाकरी मस्त थोडीशी आंबट, पण रूचकर, चविष्ट लागते.. आमच्या घरी सर्वांना आवडते.