Weekly-Horoscope , 18 ते 24 सप्टेंबर 2022

    दिनांक :18-Sep-2022
|
साप्ताहिक राशिभविष्य 
 

Weekly-Horoscope
 
मेष : कुटुंबात मंगलकार्य ठरावे
Weekly-Horoscope : आपल्या भाग्याला पाठबळ मिळत हा आठवडा सुरु झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यपणे हा आठवडा सुखकर ठरू शकेल. कुटुंबात एखादे मंगलकार्य ठरावे. संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणार्‍या कार्यक्रमाचे आयोजन आनंद देणारे राहील. आठवड्याच्या मध्यात काहींना आरोग्याचे किरकोळ त्रास निर्माण होऊ शकतात. औषधोपचार, पथ्ये सांभाळायला हवीत. वाहने सांभाळून चालवावीत. घरातील महिला वर्गांसाठी देखील हा काळ काहीसा त्रासदायक राहू शकतो. आर्थिक स्थिती सामाधानकारक राहील.
शुभ दिनांक- 19, 20, 23, 24.
 
 
वृषभ : उतावीळपणा टाळावा
काहीशा क्लेशदायक घटनांची शक्यता निर्माण करीत हा आठवडा सुरू होत आहे. ग्रहयोगातील पाप ग्रहांची अवकृपा काहीशी त्रासदायक राहू शकेल असे वाटते. त्यामुळे कार्यक्षेत्रात व सामान्य व्यवहारातही काही अडचणी निर्माण होऊ शकतात. भागीदारीच्या व्यवहारात सतर्क राहण्याची गरज आहे. रोखीचे व्यवहार करताना सावध असावे. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे लाभदायक ठरेल. स्वतःची आणि आपल्या जोडीदाराची प्रकृती सांभाळावी लागणार आहे.
शुभ दिनांक- 20, 22, 23, 24.
 
 
 मिथुन : चांगल्या घडामोडी घडाव्या
Weekly-Horoscope :या आठवड्यात आपणास बराचशी उपयुक्त ग्रहस्थिती लाभली आहे. शुभ ग्रहांची कृपा होत या आठवड्यात आपल्या हळुवार संबंधांना दृढ करण्यासाठी मजबूत प्रयत्न होऊ शकतात. युवा वर्गास विवाहादी योग जुळून येण्यासाठी उत्तम संधी लाभू शकतील. कार्यक्षेत्रात काही चांगल्या घडामोडी घडतील. सहकार्‍यांचे उत्तम सहकार्य लाभेल व उद्दिष्ट पूर्ण करून वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. कलावंतांना, साहित्यिकांना सन्मानाचे योग यावेत. कुटुंबात आनंदाचे, समाधानाचे वातावरण राहील.
शुभ दिनांक- 18, 20, 21, 24.
 
 
 कर्क : कार्यसिद्धीसाठी धडपड जरूरी
कार्यसिद्धीचे समाधान मिळविण्यासाठी या आठवड्यात आपणास जरा जोरकस प्रयत्न करावे लागतील, असे दिसत. एकंदर ग्रहमान घरात, कुटुंबात समाधानाचे वातावरण राहावे, असे सूचित करीत तर आहेत, मात्र कार्यक्षेत्रात स्वतःचे कसब पणास लावावे लागेल. अशातही अचानक उपयुक्त संधी उपलब्ध होऊ शकते. विशेषतः युवा वर्गालाही संधी येऊ शकतात. त्यांचा लाभ घ्या. विवाहाच्या संबंधात काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतात. काहींना विदेशात जाण्यासाठीचे प्रयत्न मार्गी लावता येतील.
शुभ दिनांक- 21, 22, 23, 24.
 
 
सिंह : उत्साहवर्धक स्थिती लाभावी
Weekly-Horoscope :आपल्यासाठी लाभकर स्थिती निर्माण करीत सुरु होत असलेला हा आठवडा सुखकर प्रवास, आनंद-समाधान व उत्साहवर्धक ठरणार आहे. नोकरीच्या वा व्यवसायाच्या प्रयत्नात असलेल्या युवा वर्गाला आता त्यांची कामे वेग घेताना दिसू लागतील. विशेषतः महिला वर्गाकडून काही महत्त्वाची कामे पूर्णत्वास नेणे लाभदायक ठरू शकते. आर्थिक तंगीचे वातावरण निवळताना दिसेल. वाहने सांभाळून चालवावीत. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. आरोग्याची काळजी घ्या. युवा वर्गाला मंगलकार्याचे योग यावेत.
शुभ दिनांक- 18, 19, 23, 24.
 
 
कन्या : कार्यक्षेत्रातून लाभ संभव
आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम लाभाचे योग निर्माण करीत हा आठवडा सुरू होत आहे. काही प्रबळ आर्थिक संधी लाभतील. कार्यक्षेत्रातील विरोधकांवर लक्ष ठेवावयास हवे. शंकास्पद व्यवहारांपासून स्वतःला दूर ठेवा. प्राप्त ग्रहमान विपरीत स्थितीतूनही तारून नेऊ शकेल. काही युवकांना अचानक विवाहादी योग येऊ शकतात. पाहुण्यांची वर्दळ, मित्रमंडळींसह सहली, प्रवास असे मनाला उभारी देणारे योग संभवतात. आठवड्याच्या मध्यात काहींना प्रकृतीची कुरबुर जाणवू शकते. पथ्ये सांभाळावीत.
शुभ दिनांक- 18, 20, 21, 24.
 
 
तूळ : तडजोडीची भूमिका स्वीकारा
Weekly-Horoscope :या आठवड्यातील ग्रहमान पाहता आपणांस आर्थिकदृष्ट्या काहीशी त्रासदायक स्थिती निर्माण होऊ शकते. अचानक मोठा खर्च उद्भवू शकतो. नोकरी-व्यवसायात तडजोडीची भूमिका स्वीकारणेच योग्य. कुटुंबात काही तणाव, मतभेदाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. आठवडाअखेर युवा वर्गाला अचानक चांगली संधी मिळू शकेल. विवाह, संततीच्या संदर्भात चांगले योग संभवतात. काहींना जोडीदाराच्या प्रकृतीबाबत विशेष काळजी घ्यावी लागू शकते. कला क्षेत्रातील मंडळींना प्रगतीचे योग संभवतात.
शुभ दिनांक- 19, 21, 23, 24.
 
 
वृश्चिक : खर्चाला लगाम लावा
या आठवड्याच्या सुरुवातीला आपणांस काहीशी ओढाताणीची स्थिती जाणवू शकते. एखाद्या मोठ्या खर्चाने आपली आर्थिक घडी विस्कटण्याची शक्यता नाकारता येत नाहीे. व्यवसायातील मंडळींना आर्थिक आवक देखील काही प्रमाणात प्रभावित होत असल्याचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे खर्चावर नियंत्रण असावे. कुटुंबात किरकोळ मतभेद निर्माण होऊ शकतात. एखादे जुने प्रकरण अनावश्यकपणे डोके वर काढून उगाच वाद निर्माण होऊ शकतो. जोडीदाराशी जुळवून घेणेच योग्य.
शुभ दिनांक- 20, 21, 23, 24.
 
 
धनु : धार्मिकतेकडे ओढा वाढेल
Weekly-Horoscope : या आठवड्यात आपल्या वाट्याला आलेली ग्रहस्थिती काही धार्मिक व आध्यात्मिक कार्याकडे आपला ओढा वाढविणारी आहे. तीर्थाटन, धार्मिक स्वरूपाच्या सहली, घरात एखादा धार्मिक कार्यक्रम या काळात घडू शकतो. प्राप्त ग्रहमान त्यासाठीची सारी तयारी, तडजोड घडवून आणू शकेल. काहींना आरोग्यासंबंधीचे जुने त्रास बळावताना जाणवतील. सरकारी कामातील प्रक्रिया रखडल्याने त्रासदायक ठरू शकते.कोणत्याही बातमीवर एकदम विश्वास ठेवू नका. कुटुंब व मित्रवर्गाची मदत घ्या.
शुभ दिनांक- 19, 21, 23, 24.
 
 
मकर : कुटुंबात आनंदाचे वातावरण
उत्तम म्हणावी अशा ग्रहस्थितीसह आपला हा आठवडा सुरू होत आहे. कार्यक्षेत्रात आपल्या कामाची दखल अधिकारी वर्गाकडून घेतली जाईल. आपल्या प्रयत्नांना, निर्णयांना यश मिळावे. कार्यक्षमता सिद्ध होऊ शकते. महत्त्वाची कामे, मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी हा आठवडा अनुकूल ठरेल. मान्यवर व्यक्तींच्या भेटीगाठी संभवतात. कुटुंबातील वातावरण सौहार्द्रपूर्ण राहील. कामात, निर्णयात सचोटी राहील. धार्मिक कार्याकडे ओढा वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
शुभ दिनांक- 18, 20, 22, 23.
 
 
कुंभ : भाग्यकारक योग लाभावे
Weekly-Horoscope : एखंदर सुखकर ठरावी अशा ग्रहस्थितीत हा आठवडा सुरू होत आहे. आपणास काही भाग्यकारक योग निश्चितपणे लाभतील. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे. चांगल्या संधी चालून येतील. व्यवसाय विस्तारासाठी हा काळ उत्तम ठरू शकतो. कलाक्षेत्रात असणार्‍यांना यश मिळेल. मानसन्मानाचे योग यावेत. यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मोठी खरेदी व्हावी. काहींना अचानक प्रवासाचे योग संभवतात. व्यसनांपासून मात्र दूर रहावे. आरोग्याची काळजी घ्यावी.
शुभ दिनांक- 18, 21, 23, 24.
 
 
मीन : चौफेर सतर्कता आवश्यक
Weekly-Horoscope : बव्हंशी सुखकर ग्रहस्थिती या आठवड्यात आपणास लाभली आहे. तरीही सुरुवातीला मात्र एखादी हातची संधी निसटल्याने मन खट्ट्ू होण्याचा प्रसंग निर्माण होऊ शकतो. मात्र तेवढ्यासाठी निराशेचे, नाउमेदीचे वातावरण निर्माण होऊ नये. नोकरी-व्यवसायात मात्र अपेक्षित वातावरण राहील. हितशत्रू व विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवावयास हवे. भागीदाराच्या व्यवसायात असल्यास चौफेर सतर्कता हवी. आठवडाअखेर कुटुंबात तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. आरोग्य जपा.
शुभ दिनांक- 18, 20, 23, 24.
 
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री 
-8600105746