आज पृथ्वीच्या जवळून जाणार मोठा लघुग्रह

    दिनांक :18-Sep-2022
|

fgfhghhj
 
 
नवी दिल्ली,
रविवारी एक विशाल लघुग्रह asteroid पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. शास्त्रज्ञानी सांगितल्यानुसार, 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'पेक्षाही तो सुमारे 210 मीटर मोठा आहे. नासाच्या प्रयोगशाळेनुसार (JPL) '2005 RX3' नावाचा लघुग्रह ताशी 62,820 किलोमीटर वेगाने आपल्या पृथ्वीकडे येतो आहे. अंतराळ संस्थेच्या म्हणण्यानुसार, हा लघुग्रह सुमारे 17 वर्षांपूर्वी (2005 मध्ये) पृथ्वीच्या जवळून गेला होता. तेव्हापासून नासाची जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी त्यावर लक्ष ठेवून आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, 'RX3' पुढे मार्च 2036 मध्ये पृथ्वीजवळून जाईल. 10 सप्टेंबर रोजी नासाने इशारा दिली आहे की, या महिन्यात एका आठवड्यात चार लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येतील. यापैकी एक म्हणजे '2005 RX3'.