किती दिवस चालणार विरोधी ऐक्याचा महोत्सव?

    दिनांक :18-Sep-2022
|
- गजानन निमदेव
भाजपा आणि नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्याची प्रत्येकाचीच इच्छा आहे. पण, एकमेकांबाबत प्रत्येकाच्या मनात शंका असल्याने मोदींचा पराभव करता येणे त्यांना जमेल असे वाटत नाही. सर्वाधिक काळ भाजपासोबत राहिलेले नितीशकुमार भाजपाला पराभूत करण्याच्या गोष्टी करीत असतील तर त्यांच्या हेतूबाबत इतरांच्या मनात शंका उत्पन्न होणेही स्वाभाविकच मानले पाहिजे. आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही असे जोरजोरात सांगणारा प्रत्येक नेता वेगाने दौडत असल्याचेही पाहायला मिळत आहे. ही त्यांच्या opposition unity  ऐक्याच्या मार्गातली सगळ्यात मोठी समस्या आहे.

opposition unity
 
‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आर्थिक अडचणीत आलेले विरोधक सध्या ऐक्य साधण्याची प्रक्रिया राबवत आहेत. कधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढाकार घेतात, तर कधी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव. महाराष्ट्रातल्या साडेतीन जिल्ह्यांपलीकडे ज्यांची पोहोच नाही, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना मध्येच मोदीविरोधाची आठवण होते आणि दिल्लीत जाऊन ते विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणण्याची भाषा बोलतात. गेल्या 27 वर्षांतील तब्बल 23 वर्षे भाजपासोबत संसार करणारे नितीशकुमारही आता opposition unity  विरोधी ऐक्यासाठी जोर लावत आहेत. सातत्याने भूमिका बदलत असल्याने त्यांना ‘पलटुराम’ ही मानद उपाधीही देण्यात आली आहे. तिकडे उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हेसुद्धा योगी-मोदी विरोधाने पछाडले असल्याने त्यांनाही विरोधी ऐक्य साधायचे आहे. 2014 साली नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले आणि त्यावेळपासून विरोधी पक्षांचे सगळे नेते ‘बेरोजगार’ झाले आहेत. दोन हजारपेक्षा जास्त एनजीओज मोदी सरकारने बंद केल्याने अनेकांची दुकानं कायमची बंद झाली आहेत. शिवाय, मोदींची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने दुकानं सुरू होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे वैतागलेले हे लोक ऐक्यासाठी केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत. काहीही करून मोदींना घालवायचे, हा यांचा निर्धार आहे. पण, मोदींना घालवण्यासाठी जी क्षमता आवश्यक आहे, ती यांच्यापैकी एकातही नाही, हे वास्तव आहे.
 
 
 
जाहीरपणे कितीही नाही म्हणत असले, तरी प्रत्येकाला पंतप्रधान होण्याची मनातून इच्छा आहे. शरद पवार, ममता बॅनर्जी, नितीशकुमार, के. चंद्रशेखर राव यांसारखे जे नेते आहेत, त्यांचा अहंकार तर आकाशाला भिडणारा आहे. त्यांच्यात आपसात असलेल्या या स्पर्धेमुळे त्यांचे ऐक्य घडून येईल, याची कोणतीही शक्यता दिसत नाही. निवडणुकीपूर्वी मोदींना घालवणे हा यांच्या एकत्र येण्यामागचा उद्देश असतो, तर निवडणुकीनंतर आपल्याला काही मिळते का, ते साध्य करण्यासाठी हे एकत्र येतात, हेही वास्तव आहे. यांना जनतेशी, देशहिताशी काहीही देणेघेणे नाही, हे एकदा नव्हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. टोकाचा अहंकार असलेला एकेक नेता आपापल्या परीने ऐक्य साधण्याचा प्रयत्न करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आश्वस्त आहेत. 2024 साली सत्तेत येण्याबाबत त्यांच्या मनात कसलीही शंका नाही. विविध जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून त्यांची लोकसेवा सुरू आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठीची भाजपाची व्यूहरचनाही तयार आहे. गेल्या निवडणुकीत ज्या 144 मतदारसंघांमध्ये पक्षाचे उमेदवार दुसर्‍या स्थानी होते, त्या मतदारसंघांमध्ये यश मिळविण्यासाठी काय काय करता येईल, यादृष्टीनेही भाजपाने रणनीती आखली आहे; नुसती आखलीच नाही, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्नही सुरू केले आहेत. त्यासाठी केंद्रीय मंत्री एकेका मतदारसंघाला भेट देत आहेत. स्थानिक नेतेही त्यांच्यासोबत असतात. निवडणुकीला दोन वर्षे बाकी असतानाही भाजपाची जय्यत तयारी सुरू आहे आणि तिकडे opposition unity विरोधी ऐक्य साधताना ममता-पवार-नितीश-चंद्रशेखर राव-अखिलेश यांची दमछाक होताना दिसत आहे.
 
 
भारत जोडो यात्रा करणार्‍या काँग्रेसला गोव्यात स्वत:चे आमदार जोडून ठेवता आले नाहीत, ही त्या पक्षाची शोकांतिका आहे. भारत जोडो यात्रा सर्वाधिक दिवस म्हणजे तब्बल 18 दिवस केरळ या एकाच राज्यात राहणार आहे. त्याखालोखाल यात्रेचा मुक्काम राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये राहणार आहे. कारण, इतर राज्यांत आपली डाळ शिजेल याची काँग्रेसला खात्री नाही. भारत जोडायला निघालेली काँग्रेस स्वत:साठी अध्यक्ष निवडू शकलेली नाही आणि गांधी घराण्याबाहेरचे अशोक गहलोत अध्यक्ष होण्यास तयार असले, तरी त्यांना सोबतच राजस्थानचे मुख्यमंत्रिपदही पाहिजे आहे. सत्तेचा लोभ सुटता सुटत नाही. गतकाळात नबींसारखे नेते काँग्रेसच्या गुलामीतून ‘आझाद’ झाले आहेत. अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये आश्रय घेतला आहे. तरीही काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यांच्याभोवतीचे ‘बडवे’ सुधरायला तयार नाहीत. काँग्रेस हा देशातला सर्वात जुना पक्ष आहे. देशभर कार्यकर्त्यांचे जाळे पसरले आहे. असे असताना हा पक्ष opposition unity विरोधी ऐक्य साधण्याच्या प्रक्रियेत कुठेही दिसत नाही. मोदींना टक्कर द्यायची असेल तर मजबूत ऐक्याची गरज भासेल आणि त्याची शक्यता आज तरी अजिबात दिसत नाही.
 
 
मराठीत एक वाक्प्रचार आहे. कुंपणानेच शेत खाल्ले तर... तशी स्थिती opposition unity विरोधी ऐक्याची झाली आहे. ज्या नेत्याचा अहंकार वाढला, तो स्वत:ची वेगळी वाट धरतो आणि ऐक्याला तडे देतो. ज्यांच्यावर घर बांधण्याची जबाबदारी आहे तेच घर पाडण्यासाठी प्रयत्न करणार असतील तर त्यांच्या मन:स्थितीचा विचार करा, जे घर बांधले जाण्याची प्रतीक्षा करीत आहेत. आपल्याकडे सणवार हे दरवर्षी साजरे होतात. पण, विरोधी ऐक्याचा उत्सव मात्र पाच वर्षांतून एकदाच साजरा केला जातो. ही एकप्रकारे विडंबनाच आहे. भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांना सत्तेबाहेर करणे आणि आपला उल्लू सीधा करणे या एकमेव हेतूने एकत्र येत असलेले विरोधक एरवी एकमेकांवर टीका करतात, कुरघोडी करतात. त्यांचा सत्तास्वार्थ जनतेच्या लक्षात आला असल्याने बेगडी ऐक्य 2024 ची निवडणूक त्यांना जिंकवून देईल, याची कुठलीही शक्यता नाही.
 
 
पंतप्रधानपदासाठी opposition unity  विरोधी पक्षांना नितीशकुमार हा चेहरा सापडला असे म्हणतात. पण, नितीशकुमार कधीच कुणाचे होत नाहीत. मित्रपक्ष बदल करण्यात ते वस्ताद आहेत. कपडे बदलावेत तसे ते मित्र बदलतात. तेसुद्धा कमालीचे अहंकारी आहेत. भारतीय जनता पार्टीसोबत युती करून निवडणूक लढली, कमी जागा मिळूनही भाजपाने त्यांना मुख्यमंत्रिपद दिले. असे असतानाही त्यांनी जनादेशाचा विश्वासघात करत लालूपुत्र तेजस्वी यादवशी हातमिळवणी केली आणि पुन्हा मुख्यमंत्री झाले. मित्र बदलला तरी मुख्यमंत्री तेच राहतात, हे वास्तव आहे. पण, यामुळे त्यांची विश्वसनीयता धोक्यात आली आहे. पुढल्या निवडणुकीत मतदार त्यांना सपशेल नाकारतील, यात शंका नाही.
 
 
नितीशकुमार यांनी opposition unity विरोधी ऐक्यासाठी दिल्लीचाही दौरा केला. या दौर्‍यात ते सोनिया गांधींपुढे नतमस्तकही झाले. त्याआधी त्यांनी लालूप्रसाद यादव यांचे आशीर्वाद घेतल्याचे देशाने पाहिले. मला पंतप्रधान होण्याची इच्छा नाही हे त्यांनी जाणीवपूर्वक आधीच सांगून टाकले. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांचे पटत नाही. त्यांचे संबंध सुधारण्यासाठीही नितीशकुमार सरसावले आहेत. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचेही पटत नाही. त्यांच्यात समेट घडवून आणण्यासाठीही नितीश प्रयत्न करीत आहेत. पण, नितीश दिल्लीहून बिहारमध्ये परतताच ममतांनी जे वक्तव्य केले ते बोलके आहे. राजद, जदयू, तृणमूल, झारखंड मुक्ती मोर्चा, समाजवादी पार्टी यांचे ऐक्य झाले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. त्यांनी काँग्रेसचे तर नावही घेतले नाही. आपल्याला काँग्रेस नको, असाच संदेश ममतांनी विरोधी ऐक्य साधण्याचा प्रयत्न करणार्‍या नेत्यांना दिला आहे. त्यानंतर दोनच दिवसांनी नितीशकुमार आणि तेजस्वीचे वक्तव्य आले. सोनिया गांधी विदेशातून परतताच त्यांना भेटायला दिल्लीत जाऊ. कारण विरोधी ऐक्यात काँग्रेसची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असे ते म्हणाले. याचा स्पष्ट अर्थ असा की, या दोघांनी ममतांना झिडकारले आहे. असेच हे एकमेकांना झिडकारत राहतील आणि मोदी तिसर्‍यांदा देशाचे पंतप्रधान होतील, यात शंका नाही.
 
 
तिकडे झारखंडमध्ये काँग्रेससोबत हेमंत सोरेन सरकार चालवत आहेत. ते काँग्रेसशिवाय ममतांसोबत जाऊ शकत नाहीत. अखिलेश यादव तर सातत्याने मित्राच्या शोधात असतात. मित्राशिवाय त्यांची डाळ शिजतच नाही. काँग्रेस सध्या भारत जोडो यात्रा करीत आहे. त्यांचे आमदार भाजपा जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा केरळात सर्वात जास्त दिवस राहणार आहे. तिथे डाव्यांची सत्ता आहे. याच डाव्यांसोबत काँग्रेसने ममतांविरोधात बंगालमध्ये निवडणुका लढल्या होत्या. किती विडंबना आहे? कसे होईल opposition unity  विरोधी ऐक्य अन् कसे होतील मोदी सत्तेबाहेर? शक्यच नाही. स्वार्थांध ऐक्याला जनताही थारा देणार नाही, याची खात्री आहेच. विरोधी ऐक्याची सुरुवात तशी के. चंद्रशेखर राव यांनी केली होती. पण, आता ते निराश झाल्यासारखे दिसत आहेत. स्वत:लाच राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा त्यांचा प्रयत्न ते करताहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात विरोधी ऐक्याचा आराखडा सादर करणार होते. पण, अधिवेशनात त्यांनी असे काही केल्याचे ऐकिवात नाही. भाजपा आणि नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्याची प्रत्येकाचीच इच्छा आहे. 
 
 
पण, एकमेकांबाबत प्रत्येकाच्या मनात शंका असल्याने मोदींचा पराभव करता येणे त्यांना जमेल असे वाटत नाही. सर्वाधिक काळ भाजपासोबत राहिलेले नितीशकुमार भाजपाला पराभूत करण्याच्या गोष्टी करीत असतील तर त्यांच्या हेतूबाबत इतरांच्या मनात शंका उत्पन्न होणेही स्वाभाविकच मानले पाहिजे. आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही असे जोरजोरात सांगणारा प्रत्येक नेता वेगाने दौडत असल्याचेही पाहायला मिळत आहे. ही त्यांच्या ऐक्याच्या मार्गातली सगळ्यात मोठी समस्या आहे. opposition unity  विरोधी पक्षांचे जे नेते आहेत, त्यांचा अहंकार त्यांच्या शारीरिक वजनापेक्षाही भारी आहे, हे वास्तव आहे आणि हेच वास्तव मोदींना 2024 ची निवडणूक जिंकवून देणार, ही काळ्या दगडावरील रेघ आहे. विरोधी ऐक्याचा भारतात एक इतिहास आहे. निवडणुकीआधी एकतर ऐक्य होत नाही, झाले तर सफल होत नाही आणि सफल होऊन सत्ता आली तर टिकत नाही, हेही वास्तव आहे. आपण भारतीयांनी याचा अनुभव घेतलाच आहे. स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम 1971 साली सर्वात मोठे विरोधी ऐक्य घडून आले. पण, निवडणुकीत विरोधकांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर 1977 साली जनता पार्टीच्या रूपाने विरोधक एकत्र आले; सत्ताही मिळाली. पण, ऐक्य आणि सत्ता दोन्ही टिकले नाही. हेच हाल 1989 साली जनता दलाचे झाले. आज विरोधकांकडे चेहरा नाही आणि म्हणून मोदींना पर्यायही दिसत नाही. दुसरीकडे भाजपाने आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे आणि सध्यातरी भाजपाचा पराभव होईल, असे चित्र दिसत नाही. काही राज्यांमध्ये जरी विधानसभा निवडणुकीत भाजपेतर पक्षांना मतदारांनी सत्ता सोपवली असली, तरी राष्ट्रीय पातळीवर चक्क नाकारले आहे. देशाचा कारभार चालविण्यासाठी भाजपाशिवाय एकही पक्ष लायक नाही, हेच मतदारांनी प्रत्यक्ष मतपेटीतून वेळोवेळी प्रत्यक्ष दाखवून दिल्याने 2024 साली काय होणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. opposition unity  विरोधी ऐक्य हा केवळ फार्स ठरणार, ही काळ्या दगडावरील रेघ आहे.