अटल पेन्शन योजनेचा 'या' लोकांना लाभ नाही...जाणून घ्या माहिती

    दिनांक :20-Sep-2022
|
नवी दिल्ली,
मोदी सरकारची सर्वात लोकप्रिय योजना Atal Pension Yojana अटल पेन्शन योजना (APY) मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. 1 ऑक्टोबरपासून करदात्यांना या योजनेत सहभागी होता येणार नाही. नुकत्याच सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर 2022 पासून, कोणताही नागरिक जो आयकरदाता आहे तो अटल पेन्शन योजनेत (APY) सामील होण्यास पात्र राहणार नाही. PFRDA डेटानुसार, 30 सप्टेंबर 2021 पर्यंत अटल पेन्शन योजनेअंतर्गत एकूण ग्राहकांची संख्या 32.13 टक्क्यांनी वाढून 312.94 लाख झाली आहे. या योजनेच्या ग्राहकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा हिस्सा 2.33 कोटींहून अधिक आहे.

atalk
 
खाते बंद केले जाईल
नवीन दुरुस्तीनुसार, जर एखादा करदाता 1 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी Atal Pension Yojana अटल पेन्शन योजनेचा भाग बनला तर त्याचे खाते बंद केले जाईल आणि त्याचे संपूर्ण पैसे परत केले जातील. 18-40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक अटल पेन्शन योजनेत सामील होऊ शकतो. या योजनेंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर 1000 ते 5000 रुपयांपर्यंत पेन्शनची तरतूद आहे. पेन्शनची रक्कम तुमच्या योगदानावर अवलंबून असते.