70 वर्षांत प्रथमच गुरू पृथ्वीच्या जवळ येणार

    दिनांक :20-Sep-2022
|
नवी दिल्ली, 
Earth जगभरातील खगोलप्रेमींसाठी आगामी 26 सप्टेंबर हा दिवस विलक्षण पर्वणी घेऊन येत आहे. पृथ्वीपासून कोट्यवधी मैलांवर असणारा गुरू हा ग्रह पृथ्वीच्या अतिशय जवळ येणार आहे. या दिवशी सूर्यास्ताच्या काही वेळानंतर पूर्व दिशेला गुरूचा उदय होईल. पृथ्वीच्या जवळ आल्याने गुरू नेहमीपेक्षा आकाराने मोठा आणि अधिक चमकदार दिसणार आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी नासाचे डीआरटी हे यान एका धूमकेतूला धडक देणार आहे. सुमारे 70 वर्षांपूर्वी हा योग आला होता. आता पुन्हा गुरू आणि पृथ्वी एकमेकांच्या जवळ आलेले असतील. साधारणपणे प्रत्येक 13 महिन्यांनंतर गुरू हा ग्रह पृथ्वीच्या जवळ येत असतो. मात्र, यावेळी दोघांमधील अंतर फारच कमी झालेले असेल. हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळून प्रवास करतील. 26 सप्टेंबरच्या रात्री गुरूचे आगळेवेगळे आणि चमकदार रूप खगोलप्रेमींना पर्वणीच ठरणार आहे.
 
wwe
अंतर असेल 37 कोटी मैल
26 सप्टेंबर रोजी गुरू आणि पृथ्वी या दोन्ही ग्रहांमधील अंतर 37 कोटी मैल इतके असणार आहे. एरव्ही साधारणपणे त्यांच्यात 60 कोटी मैल इतके अंतर असते. असा योग 70 वर्षांनंतर येत असल्याने, नव्या पिढीसाठी हा योग दुर्मिळ ठरणार आहे. नासाच्या मते, दुर्बिणीच्या मदतीने गुरूचा चंद्र गॅलिलिनलाही पाहता येणार आहे. Earth उंच ठिकाणाहून आणि विशेषत: अंधारलेल्या भागातून गुरूचा हा चंद्र अधिकच स्पष्ट दिसणार आहे. विशेष म्हणजे, गुरूला 53 चंद्र आहेत. मात्र, वैज्ञानिकांच्या मते, गुरूच्या चंद्रांची सं‘या 79 इतकी आहे.