बँक ऑफ महाराष्ट्रला राजभाषेचा सर्वोच्च कीर्ती पुरस्कार बहाल

    दिनांक :21-Sep-2022
|
पुणे, 
गुजरातच्या सूरत शहरात Bank of Maharashtra नुकत्याच झालेल्या एका समारंभात केंद्रीय मंत्रालयातर्फे देण्यात येणारा राजभाषा वापरासाठीचा प्रतिष्ठित व सर्वोच्च असा कीर्ती पुरस्कार हा सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या Bank of Maharashtra बँक ऑफ महाराष्ट्रला बहाल करण्यात आला. राजभाषेचे प्रभावी कार्यान्वयन व सर्वोत्तम अंतर्गत मासिक पत्रिका या दोन वेगवेगळ्या वर्गवारीत बँकेला हा प्रतिष्ठेचा कीर्ती पुरस्कार बहाल करण्यात आला. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 
Bank of Maharashtra
 
कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी Bank of Maharashtra बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी अमित शाह तसेच केंद्रीय गृह राज्यमंत्रीद्वय निशिथ प्रामाणिक व अजय कुमार मिश्रा यांचा सत्कार केला. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
बँक ऑफ महाराष्ट्रच्या Bank of Maharashtra मनुष्यबळ व्यवस्थापन व राजभाषा विभागाचे सरव्यवस्थापक के. राजेश कुमार यांनी राजभाषेचे प्रभावी कार्यान्वयन या वर्गवारीत तर बँक ऑफ महाराष्ट्रच्या राजभाषा विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉ. राजेंद्र श्रीवास्तव यांनी सर्वोत्तम अंतर्गत मासिक पत्रिका या वर्गवारीत राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.