काय सांगता! ऑर्डर केले सॅण्डविच, आले ४३ हजार कॅश!

Chicken Sandwich रेस्टॉरन्टमधून केले होते ऑर्डर

    दिनांक :21-Sep-2022
|
नवी दिल्ली,
Chicken Sandwich आपल्यावरील वाढते कर्ज आणि उत्पन्नाचे मर्यादीत स्रोत...अशा स्थितीत चक्क हजारो रुपये, नीट, व्यवस्थित एका लिफाफ्यात बंद करून मिळाले तर...! कल्पनेतील ही घटना अमेरिकेतील एका महिलेच्या बाबतीत खरी ठरली आहे. केएफसी या प्रसिद्ध फूट आऊटलेटमधून, तिने Chicken Sandwich काही ऑर्डर केले होते. घरी जाऊन टेक अवे बॅग उघडताच तिला Chicken Sandwich आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
 
chick
 
 Chicken Sandwich अमेरिकेत राहणारी जोआने ऑलिव्हर जॉर्जिया ही मध्यमवयीन महिला कर्जबाजारी झाली आहे. कोरोनाकाळात नोकरी गमावलेल्या जोआनेचा उदरनिर्वाह तुटपुंज्या कमाईवर सुरू आहे. तिने दुपारच्या जेवणासाठी केएफसीमधून चिकन सॅण्डविच ऑर्डर केले. टेक अवे सेवेतून तिने खाण्याचे पाकीट घेतले आणि घरी गेली. Chicken Sandwich पाकीट उघडले तर त्यात सॅण्डविचच्या खाली काहीतरी जाडजूड वस्तू असल्याचे जाणवले. तिने बघितले तर एक लिफाफा सॅण्डविचेसच्या खाली ठेवलेला होता. तिने लिफाफा उघडून पाहिला तर तिला आश्चर्याचा धक्का बसला कारण त्या लिफाफ्यात चक्क ४३ रुपयांच्या नोटा होत्या.
Chicken Sandwich अचानकपणे एवढे पैसे मिळाल्यानंतर, गाडीची पेट्रोल टँक फुल्ल करावी की मनमुराद शॉपिंग करावी? असा प्रश्न साहजिकच तिला पडला. पण, जोआने संयमित राहीली आणि तिने पोलिसांना फोन करून या प्रकाराची माहिती दिली. पाकीट उघडताच पैसे दिसले आणि मी ते मोजले. ते पूर्ण ४३ हजार होते. Chicken Sandwichमग मी लिफाफा पुन्हा बंद केला आणि तेव्हापर्यंत पोलिस दाखल झाले होते. तपासात पोलिसांच्या लक्षात आले की, केएफसीच्या गल्ल्यावर जमा झालेले पैसे चुकून जोआनेच्या पार्सलमध्ये टाकले गेले होते. पोलिसांनी पैसे कंपनीच्या कर्मचा-यांकडे सुपूर्द केले आणि जोआनासाठी एक छानशी फेसबुक पोस्ट लिहिली.
 
Chicken Sandwich जोआनाच्या या कृतीमुळे केएफसीच्या मॅनेजरची नोकरी वाचली, हे विशेष! सोशल मिडीयावरही नेटक-यांनी जोआनेच्या नैतिकतेचे खूप कौतुक केले. Chicken Sandwich अशा घटना नेहमीच घडत असतात आणि सजग नागरिक आपल्या नैतिक मूल्यांवर आधारीत विवेकपूर्ण कृतीने नवे आदर्श स्थापन करीत असतात.