लिपिकांची रिक्त पदे लोकसेवा आयोगामार्फत भरणार

    दिनांक :21-Sep-2022
|
मुंबई, 
राज्यातील वर्ग 3 मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे Public Service Commission महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सध्या राज्यातील अ आणि ब गटातील अधिकार्‍यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही आयोगामार्फत केली जाते. आयोगाच्या कार्यक्षमतेचा विचार करून मुंबई प्रमाणेच राज्यभरातील लिपिकांची देखील रिक्त पदे आयोगामार्फतच भरण्यात यावी, असे ठरले. दरम्यान, आपत्ती निवारणाच्या विविध प्रकरणांची चर्चा व निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची नेमण्याचा निर्णय झाला.
 
Public Service Commission
 
लसीकरणात महाराष्ट्र सर्वप्रथम यावा
कोविड लसीकरणात देशात महाराष्ट्र सर्वप्रथम असावा, याद़ृष्टीने Public Service Commission सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रयत्न करावे, असे मु‘यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.