युद्ध थांबविण्यासाठी पुतीन यांचा मोठा निर्णय...

घेणार सार्वभौम चाचणी

    दिनांक :21-Sep-2022
|
मॉस्को,
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन Putin पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी रशियामध्ये सैन्यांना एकत्र येण्याचा आदेश दिला असून यासोबतच त्यांनी पाश्चिमात्य देशांना इशारा हलक्यात न घेण्याचा सल्ला दिला आहे. रशियाच्या सुरक्षेसाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत, असे पुतीन म्हणाले. पुतिन यांनी सध्या 300,000 अतिरिक्त सैन्याच्या हालचालीचे आदेश दिले आहेत. पुतिन यांनी बुधवारी एका दूरचित्रवाणी भाषणात ही माहिती दिली. याआधी मंगळवारी अशी बातमी आली होती की, रशिया युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागात सार्वमत घेण्याच्या तयारीमध्ये आहे. दरम्यान रशियाच्या या तयारीला पाश्चात्य देशांनी विरोध केला असून असे केल्याने तणाव वाढेल असे म्हटले होते.

ASEW
 
युक्रेनचे 4 प्रदेश विलीन करण्याची योजना
खरे तर रशियाने 4 प्रदेश विलीन करण्याची योजना आखली असून त्याअंतर्गत सार्वमताची योजना आखण्यात आली आहे. शुक्रवारपासून लुहान्स्क, खेरसन आणि डोनेस्तकसह चार प्रांतात सार्वमत सुरू होणार आहे. हे सार्वमत रशियाच्या सांगण्यावरून केले जात असून त्यानंतर रशिया या प्रांतांवर कब्जा करण्याच्या दिशेने वाटचाल करू शकेल, असे बोलले जात आहे. दरम्यान, Putin पुतीन यांनी पाश्चात्य देशांवर ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, नाटो देशांच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने आण्विक ब्लॅकमेलिंग वक्तव्ये दिली आहेत त्यावरून हे दिसून येते की, ते रशियाच्या विरोधातही अण्वस्त्रांचा वापर करू शकतात. व्लादिमीर पुतिन यांनी पाश्चिमात्य देशांना इशारा देताना म्हटले आहे की, 'जे लोक रशियाविरोधात अशा विधानांना प्रोत्साहन देत आहेत, त्यांनी हे लक्षात ठेवावे की रशियाकडेही नाटो देशांशी व्यवहार करण्यासाठी आवश्यक ते सर्व काही आहे. जेव्हा जेव्हा आपल्या देशाच्या एकतेला आणि अखंडतेला धोका निर्माण होईल तेव्हा आम्ही आमची पूर्ण शक्ती वापरू. पुतिन म्हणाले की, हा इशारा कोणीही हलक्यात घेऊ नये. दरम्यान, बुधवारपासून पुतिन यांनी लष्करी जमाव करण्याचे आदेश दिले आहेत. याअंतर्गत ज्या नागरिकांनी लष्करी प्रशिक्षण घेतले आहे, त्यांना तयार केले जाईल.