अमेरिकेने खतरनाक अफगाणी ड्रग माफियाला सोडले

- भारतासह कित्येक देशांची चिंता वाढली

    दिनांक :21-Sep-2022
|
वॉशिंग्टन, 
हाजी बशीर नुरजई नावाच्या खतरनाक Afghan drug mafia अफगाणी ड्रग माफियाला अमेरिकेने गुपचूप सोडले आहे. अफगाणिस्तानातील तुरुंगात खितपत पडलेल्या अमेरिकी नागरिकाच्या बदल्यात हाडी नुरजईची सुटका करण्यात आली. त्याच्या सुटकेमुळे भारतासह कित्येक देशांच्या गुप्तचर यंत्रणांची चिंता वाढली आहे. त्याची सुटका झाल्यामुळे मादकपदार्थांची तस्करी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
Afghan drug mafia
 
काही वर्षांपूर्वी जगातील कोणत्याही कोपर्‍यात मादकपदार्थ जप्त केले जायचे, त्यावेळी Afghan drug mafia हाजी बशीर नुरजईचे नाव समोर यायचे. त्याला मध्यपूर्वेतील ‘पाब्लो एस्कोबार’ म्हटले जाते. तो कित्येक वर्षांपासून अमेरिकी तुरुंगात बंद होता. अमेरिकेतील एका न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
 
 
हाजी नुरजई तालिबानी समर्थक Afghan drug mafia होता. नंतर त्याने अमेरिकी सरकारसाठी हेर म्हणून काम सुरू केले होते. त्यामुळे मोस्ट वॉण्टेड ड्रग माफिया असतानाही त्याला अटक होऊ शकली नाही. याच अटीवर त्याने अमेरिकेसाठी काम सुरू केले होते. मात्र, एकदा हाजी नुरजई न्यूयॉर्कमध्ये आला असताना त्याला अटक करण्यात आली. या कालावधीत अमेरिकी सैन्य परतले आणि तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानात सत्ता ताब्यात घेतली होती. त्यावेळी तालिबानने अमेरिकी सरकारसोबत वाटाघाटी करून अफगाणी तुरुंगात असलेला अमेरिकी अभियंता मार्क फ‘ेरिचच्या मोबदल्यात नुरजईच्या सुटकेची मागणी केली. मार्क फ‘ेरिचचे जानेवारी 2020 मध्ये अपहरण करण्यात आले होते.
 
 
सोव्हिएत सैन्याविरुद्ध लढला होता नुरजई
हाजी नुरजई 1979 पासून 1989 पर्यंत Afghan drug mafia अफगाणिस्तानचा ताबा घेणार्‍या सोव्हिएत रशियाच्या सैन्याविरुद्ध लढला होता. मुल्ला उमर भूमिगत झाल्यानंतर नुरजईने कंधार सोडले. मात्र, त्याने तालिबानी शासकांना स्फोटके, शस्त्रास्त्रे आणि भाडोत्री अतिरेकी उपलब्ध केले होते.
 
 
9/11 हल्ल्यावेळी होता क्वेटात
अमेरिकेवर झालेल्या 9/11 हल्ल्यावेळी नुरजई क्वेटात होता. Afghan drug mafia हल्ल्याची माहिती मिळताच तो अफगाणिस्तानात परतला. त्यावेळी अमेरिकेचे स्पेशल फोर्सच्या अधिकार्‍यांची भेट त्याने घेतली होती. अमेरिकी अधिकार्‍यांनी त्याला कंधारला नेले आणि ताब्यात घेतले. त्यानंतर नुरजई अमेरिकेसोबत काम करण्यास तयार झाला. 2002 च्या अखेरीस त्याने तालिबानची जवळपास 400 विमानरोधी क्षेपणास्त्रांसह 15 ट्रक शस्त्रास्त्रे अमेरिकी सैन्याला सोपवले होते. ही शस्त्रास्त्रे तालिबानने लपवलेली होती.