आयएसआय एजंटची नेपाळमध्ये पळवून हत्या

    दिनांक :22-Sep-2022
|
- भारतविरोधी कारवायांत सहभाग
- बनावट नोटांचा मोठा पुरवठादार
 
काठमांडू, 
पाकिस्तानची कुटील गुप्तचर संस्था ISI agent आयएसआयच्या एजंटची नेपाळमधील काठमांडू येथे सोमवारी (19 सप्टेंबर) गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याला पळवून पळवून मारण्यात आले. पाकिस्तान त्याच्या माध्यमातून बनावट चलन भारतात पाठवायचा. तो बनावट नोटांचा सर्वांत मोठा पुरवठादार होता. लाल मोहम्मद उर्फ मोहम्मद दर्जी, असे या एजंटचे नाव आहे. त्याच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. चारचाकी वाहनातून उतरताच दर्जीवर एक अज्ञात हल्लेखोर गोळ्या झाडत असल्याचे आणि जीव वाचवण्यासाठी दर्जी वाहनाच्या भोवती पळत असल्याचे यात दिसून आले.
 
 
ISI agent
 
ISI agent आयएसआयच्या सांगण्यावरून दर्जी पाकिस्तान आणि बांगलादेशातून बनावट नोटा नेपाळमध्ये आणायचा नंतर त्याची तस्करी भारतात करायचा. आयएसआयला तो वाहतूक व्यवस्थेसाठीही मदत करायचा आणि दाऊद इब्राहिमच्या टोळीसोबत त्याचे संबंध होते, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दर्जी वाहनाभोवती पळत सुटला आणि लपण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी गोळीबार सुरूच ठेवल्याचे दिसत आहे. दर्जीच्या मुलीने त्याला वाचवण्यासाठी पहिल्या माळ्यावरून उडी घेतली. मात्र, तोवर दर्जीला ठार करून पळ काढण्यात हल्लेखोर यशस्वी झाले होते.