दही - दुधाचे भाव पुन्हा एकदा वाढणार

    दिनांक :22-Sep-2022
|
मुंबई, 
सणासुदीच्या तोंडावर जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत आहेत. त्यात आता पुन्हा एकदा Increase in milk prices दुधाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईमुळे दूध व दह्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. नुकतेच दूध-दह्याचे दर वाढवण्यात आले होते. डिझेलचे दर वाढल्याने दुधाचे दरही वाढल्याचे मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष बंदलिश यांनी सांगितले.
 
 
Milk ei
 
दरवाढीत शेतकर्‍यांना फायदा होत असल्याचा दावा त्यांनी केला. चालू आर्थिक वर्षात Increase in milk prices दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत 15 टक्क्यांहून अधिक वाढ होत आहे, असे त्यांनी सांगितले. मदर डेअरीचा 70 टक्के व्यवसाय दूध व दुग्धजन्य पदार्थांचा आहे. याशिवाय मदर डेअरी फळे व भाज्यांच्या क्षेत्रातही उतरले आहे. यावर्षी आईस्क्रीमची विक्री बम्पर होण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात मदर डेअरीमधील उत्पादनांवर प्रॉडक्ट्सवर 20 टक्के किंमत वाढण्याची शक्यता आहे. मदर डेअरीची उलाढाल 15 हजार कोटींपर्यंत पोहोचू शकते, असे ते म्हणाले.