सुरक्षा परिषदेतील भारताच्या कायम सदस्यत्वावर अमेरिकेचा भर

    दिनांक :22-Sep-2022
|
वॉशिंग्टन, 
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी भारतासह जपान आणि जर्मनीला संयुक्त राष्ट्र Security Council सुरक्षा परिषदेचे (यूएनएससी) कायम सदस्यत्व प्रदान करण्यावर भर दिला आहे. याशिवाय आपल्या पाठिंब्याचे जोरदार समर्थनही केले आहे. बायडेन प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, भारत आणि सुरक्षा परिषद यांच्यातील प्रस्तावाला या अगोदरही अमेरिकेचे समर्थन होते आणि आजही हीच भूमिका कायम आहे.
 
 
unsc er
 
भारत, जपान आणि जर्मनीला Security Council सुरक्षा परिषदेचा कायम सदस्य बनवण्यात यावे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मागील काही दिवसांत संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रात बोलताना सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची पुन्हा एकदा सूचना केली. या महत्त्वाच्या संस्थेमध्ये काळानुरुप सुधार होण्याची वेळ आली आहे. याशिवाय आपल्या देशानेही संयुक्त राष्ट्र चार्टरचे रक्षण करावे. तसेच, व्हेटोपासून बचाव करावा. या अधिकाराचा वापर फ क्त विशेष किंवा विषम परिस्थितीतच होणे गरजेचे आहे, जेणेकरून परिषदेवरील विश्वसार्हता आणि प्रभाव कायम राहील. याच कारणामुळे अमेरिका नेहमीच सुरक्षा परिषदेत कायम आणि हंगामी अशा दोन्ही प्रकारच्या सदस्यांची सं‘या वाढवण्यावर देत असल्याचेही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी स्पष्ट केले होते. यानंतर आता पुन्हा या मुद्याने उचल घेतलेली आहे.