सलग दुसर्‍या दिवशी शेअऱ बाजारांत घसरण

    दिनांक :22-Sep-2022
|
मुंबई :
अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवण्याचा घेतलेला निर्णय आणि गुंतवणूकदारांनी घेतलेल्या सावध भूमिकेचे पडसाद आज गुरुवारी जागतिक शेअर बजारांसह देशातील शेअर बाजारावरही उमटले. आजच्या सत्रात मुंबई stock market शेअर बाजाराचा निर्देशांक 337 अंकांनी घसरून 59,119 अंकांवर बंद झाला.
 
 
stock market sdfhu
 
राष्ट्रीय stock market शेअर बाजाराचा निफ्टी 88 अंकांनी घसरून 17,629 या पातळीवर बंद झाला. आजच्या सत्रात पॉवर गि‘ड, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या समभागांची घसरण झाली. दुसरीकडे टायटन, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, मारुती आणि आयटीसी या कंपन्यांच्या समभागांना मात्र फायदा झाला.