अर्जुन उपांत्य फेरीत, प्रज्ञानंद बाहेर

    दिनांक :23-Sep-2022
|
- ज्युलियस बेअर चषक बुद्धिबळ

न्यू यॉर्क, 
येथे सुरू असलेल्या ज्युलियस बेअर जनरेशन चषक आभासी जलद बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रॅण्डमास्टर Arjuna Erigaisi अर्जुन एरिगाईसीने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली, मात्र त्याचा संघमित्र आर. प्रज्ञानंदचे आव्हान संपुष्टात आले. टायब्रेकरमध्ये झालेल्या सामन्यात अर्जुनने ख्रिस्तोफर यूचा पराभव करीत स्पर्धेच्या अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. आर. प्रज्ञानंद मात्र जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरकडून 1-3 असा पराभूत झाला.
 
 
ARJUN-ERAGAISI
 
जगज्जेेता मॅग्नस कार्लसनने अमेरिकेच्या लेव्हॉन अरोनियनवर विजय नोंदवून उपांत्य फेरी गाठली. आता त्याची गाठ 17 वर्षीय कीमरशी पडेल, तर अन्य उपांत्य फेरीत Arjuna Erigaisi अर्जुन एरिगाईसीचा सामना व्हिएतनामच्या लिम क्वांग ले याच्याशी होईल. चार वेगवान डावानंतर 19 वर्षीय अर्जुन व 15 वर्षीय ख्रिस्तोफर यूने 2-2 ने बरोबरी मिळविली. अर्जुने सलामीचा सामना जिंकला, मात्र पुढील दोन डावांमध्ये त्याने विजयाची पुनरावृत्ती केली. ब्लिट्झ टाय-ब्रेकमध्ये अर्जुनने पहिला विजय मिळविला व दुसरा सामना अनिर्णीत राखून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आर. प्रज्ञानंदला सामन्याच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. त्याचे दोन डाव अनिर्णीत राहिले. 17 वर्षीय प्रज्ञानंदला टायब्रेकमध्ये विजयाची गरज असताना जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरने 42 चालीत विजय मिळविला व उपांत्य फेरीत आपले स्थान केले.