भंडारा शहरातील समस्या सोडवा - जयश्री बोरकर

न.प. मुख्याधिका-यांना निवेदन

    दिनांक :23-Sep-2022
|
भंडारा, 
नगर परिषद भंडारा च्या हद्दीत अनेक समस्या निर्माण Bhandara city झाल्या असून त्यांचे निवारण करण्याबाबद काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेविका जयश्री बोरकर यांच्या नेतृत्वात मुख्यधिकारी विनोद जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई प्रामुख्याने उपस्थित होते.
 

fg  
 
भंडारा नगर परिषद हद्दीमध्ये आपले बरेसचे कामे Bhandara city अपूर्ण अवस्थेत आहेत. शहरात लावलेले सिग्नल मागील तीन वर्षा पासून आजपर्यंत सुरू झालेले नाही. शहरात बèयाच चौकांमध्ये कॅमेरे लावले आहेत, त्यातील मोजकेच कॅमेरे सुरू असून बहुतांश कॅमेरे बंद आहेत. त्यासाठी निविदा काढून चार वर्ष पूर्ण झाले मात्र कॅमेरे सुरू झाले नाही. शहरातील नळातून लोकांना अशुध्द पाणी पुरवठा होत आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून काही ठिकाणी आरो प्लांट बसविले आहेत, मात्र त्यांची देखभाल होत नसल्याची समस्या यावेळी मुख्याधिका-यांना सांगण्यात आली. तसेच शहरात ठीकठिकाणी रस्त्याची अवस्था खूपच खराब झाली आहे. रस्त्यावर खड्डे आहेत कि खड्डयांवर रस्ते हेच समजत नाही. मुस्लीम लायब्ररी चौक ते त्रिमुर्ती चौक, बीएसएनएल कार्यालय ते खातरोड रेल्वे क्रोसिंगपर्यंतचा रस्ता, राजीव गांधी चौक ते तकियाकडे जाणारा रस्त्याची दुरूस्ती करावी, भंडारा शहरात कुठेही पार्किंगची व्यवस्था करावी, जुन्या गांधी विद्यालयाच्या जागेवर नगर परिषदेतर्फे शहरातील शिक्षण घेणा-या मुलांकरिता प्रशस्त अभ्याशिका बांधून द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या. या सर्व समस्यांबाबत सविस्तर चर्चा करून लोकांना होणा-या त्रास कमी होईल, यादृष्टीने तात्काळ योग्य पावले उचलावी अन्यथा जनआंदोलन करू असेही मुख्याधिकारी यांना स्पष्ट करण्यात आले.
यावेळी जिल्हा महासचिव धनंजय तिरपुडे, जिल्हा महासचिव अजय गडकरी, अनुसूचित जाती महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा चव्हाण, शहर अध्यक्ष प्रशांत देशकर, विनितकुमार देशपांडे, पृथ्वीराज तांडेकर, जीवन भजनकर, रिना हटवार, विजू तोमर, नंदा मोगरे, रवींद्र थानधराटे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.