दुहेरी भूमिका पार पाडणारी क्षेपणास्त्रे खरेदी करणार

    दिनांक :23-Sep-2022
|
- संरक्षण मंत्रालय, ब्रह्मोस यांच्यात करार
 
नवी दिल्ली, 
संरक्षण क्षेत्रात देशाला आणखी आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकताना संरक्षण मंत्रालयाने BrahMos Aerospace ब्रह्मोस एअरोस्पेससोबत एकाचवेळी दोन भूमिका पार पाडू शकेल, अशा जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांच्या खरेदी करारावर स्वाक्षरी केली. ‘बाय इंडियन’ धोरणांतर्गत हा सुमारे 1700 कोटी रुपयांचा करार आहे.
 
 
brahos oooo
 
संरक्षण मंत्रालयाने काढलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या क्षेपणास्त्रांमुळे नौदलाची मारक क्षमता कितीतरी पटीने वाढणार आहे. BrahMos Aerospace ब्रह्मोस एअरोस्पेस प्रा. लि. हा भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम असून, जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या नव्या आणि अत्याधुनिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीत कंपनीची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
सैन्यासाठी 4.25 लाख स्वदेशी कार्बाईन बनवणार
लष्करासाठी 4.25 लाख स्वदेशी कार्बाईन तयार करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने 5.5645 मिमी. 4,25,213 क्लोज क्लोर्टर कार्बाईन्सच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. एवढ्या कार्बाईन्सच्या उत्पादनाला वेळ लागणार असल्याने खाजगी किंवा सार्वजनिक अशा दोन उत्पादकांशी करार करण्याची योजना आहे. यात सर्वोत्तम बोली लावणार्‍या कंपनीला 2 लाखांवर कार्बाईन्स तयार करण्याची ऑर्डर मिळू शकते. प्रकल्पासाठी 5 हजार कोटींहून अधिक निधीची तरतूद करण्यात येणार आहे.