उद्धव ठाकरेंनी अमित शहांविषयी विचारपूर्वक बोलावे : बावनकुळे

    दिनांक :23-Sep-2022
|
औरंगाबाद, 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतका धसका का घेतला आहे, समजत नाही. त्यांच्याविषयी उद्धव ठाकरे यांनी विचारपूर्वक बोलावे. नाही तर उरलेल्या आमदारांपैकी बहुतेक जण सोडून जातील आणि ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणत केवळ चारच उरतील, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष Chandrasekhar Bawankule चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक‘वारी येथे एका पत्रपरिषदेत केली. बावनकुळे म्हणाले, अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. ते मुंबईत आले तर त्यामध्ये ठाकरे यांना चुकीचे काही वाटण्याचे कारण नाही. अमित शाह हे उद्धव ठाकरे यांचा कधीही उल्लेख करत नाहीत. त्यांचे नाव घेऊन टीका करण्याने उद्धव ठाकरे यांनी जे गमावले आहे, ते परत येणार नाही. उलट उरलेले थोडे आमदार त्यांनी सांभाळावेत नाही तर मुख्यमंत्री शिंदे त्यांना कधी नेतील कळणारही नाही.
 
 
Amit Shah-Thackeray
 
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 608 पैकी 294 सरपंच भाजपाचे निवडून आले आहेत. आपल्याकडे त्यांची नावे व पक्षातील पदांसह पूर्ण माहिती आहे. त्याखेरीज मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे 41 सरपंच निवडून आले आहेत. या बाबतीत जे कोणी राजकीय पक्ष दावे करत आहेत त्यांना आपले आव्हान आहे की, त्यांनी सविस्तर यादी द्यावी. त्याचबरोबर आम्हीही देऊ, असेही Chandrasekhar Bawankule बावनकुळे यांनी सांगितले. ते म्हणाले की, भाजपा राज्यातील सर्व 95,507 बूथमध्ये पक्ष संघटना बळकट करत असून आम्ही 51 टक्के मते मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आमच्या विरोधात तिन्ही पक्ष एक झाले तरी आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राज्यात लोकसभा निवडणुकीत किमान 45 आणि विधानसभा निवडणुकीत किमान 200 जागांवर विजय मिळवू.
 
 
त्यांनी सांगितले की, मराठवाडा आणि विदर्भाच्या वैधानिक विकास मंडळांना महाविकास आघाडी सरकारने मुदतवाढ दिली नाही, हे त्या आघाडीचे मोठे षडयंत्र होते. महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल महोदय बारा आमदार देत नाहीत तोपर्यंत वैधानिक विकास मंडळ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेवर आल्यानंतर लगेचच विकासासाठी काम सुरू केले आहे. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याशी आपली चर्चा झाली असून त्या नाराज नाहीत. त्या जोमाने पक्षाचे काम करत आहेत. त्यांच्या नाराजीबद्दल कपोलकल्पित बातम्या प्रसिद्ध करून त्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही Chandrasekhar Bawankule बावनकुळे म्हणाले.