एल्विस, रिमोने पोहून पार केली उत्तर खाडी

    दिनांक :23-Sep-2022
|
-14 तास 38 मिनिटांत पराक्रम

नवी दिल्ली, 
भारताच्या लांब पल्ल्याचे जलतरणपटू आसामचे Elvis Ali Hazarika एल्विस अली हजारिका व पश्चिम बंगालचा रिमो साहाने युरोपमधील उत्तर खाडी यशस्वीपणे पार करून इतिहास रचला. या दोघांचा संघ उत्तर खाडी पार करणारा भारतातील व आशियातील पहिला रिले संघ ठरला.
 
 
ELVIS-ALI-HAZARIKA
 
उत्तर-पूर्व नॉर्दर्न आयर्लण्ड आणि दक्षिण-पश्चिम स्कॉटलंडदरम्यानची उत्तर खाडी यशस्वीपणे पार करणारे हे दोघे आपापल्या राज्यांतील पहिले जलरणपटू ठरले. या दोघांची जोडी उत्तर खाडी पार करणारा पहिला आशियाई रिले संघ आहे. 14 तास 38 मिनिटांत हा पराक‘म करणारा Elvis Ali Hazarika हजारिका हा भारतातील सर्वात वयस्कर जलतरणपटू आहे. मी खूप दिवसांपासून या दिवसाची प्रतीक्षा करीत होतो. बरेच प्रयत्न व दररोज तासन्तास कठोर परिश्रम केल्यानंतर उत्तर खाडी यशस्वीपणे पोहून पार करणारा पहिला आसामी झालो, असे हजारिका यांनी सांगितले. हजारिका यांनी आपला हा दुर्मिळ पराक‘म पत्नी प्रणामीला तिच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून समर्पित केला. दोन वर्षांच्या कठोर प्रशिक्षणानंतर मी स्वप्नवत ध्येय गाठले, असे सहाने सांगितले. त्यांनी उत्तर आयर्लण्डमधील डोनाघडी हे प्रारंभ बिंदू आणि स्कॉटलंडमधील पोर्टपट्रिक हे अंतिम बिंदू म्हणून सुमारे 42 किलोमीटरचे अंतर पोहले.