वन-डे विश्वचषक जिंकू न शकणे ही एकच खंत : झुलन गोस्वामी

    दिनांक :23-Sep-2022
|
लंडन, 
आपल्या दोन शतकांच्या कारकीर्दीत वन-डे विश्वचषक जिंकू न शकणे ही एकच खंत असेल, असे भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने शनिवारी आपल्या अंतिम आंतरराष्ट्रीय कि‘केट सामन्याच्या पूर्वसंध्येला माध्यमांशी बोलताना म्हणाली. लॉर्डस् मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा वन-डे सामना होत असून या सामन्यानंतर उजव्या हाताची वेगवान गोलंदाज 39 वर्षीय Jhulan Goswami झुलन गोस्वामी आंतरराष्ट्रीय कि‘केटमधून निवृत्त होणार आहे.
 
 
Jhulan Goswami
 
कि‘केटने मला नाव व प्रसिद्धी दिल्याबद्दल कृतज्ञ आहे. 2005 आणि 2017 मध्ये दोन वन-डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळली, परंतु आम्ही विश्वचषक जिंकू शकलो नाही. हीच खंत उराशी राहणार आहे. विश्वचषकासाठी खूप मेहनत घेतली, परंतु दोन्ही वेळा आम्हाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, असे ती म्हणाली. चकदाह (पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील) सार‘या लहान शहरातून मी कि‘केट खेळायला सुरुवात केली, तेव्हा मी इतके दिवस भारताकडून खेळेल, याची कल्पनाही केली नव्हती. भारतीय संघाच्या शिबिरात संधी मिळणे हा माझ्या कि‘केट प्रवासातील सर्वात संस्मरणीय क्षण होता, असे ती म्हणाली. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडदरम्यानचा ईडन गार्डन्सवर 1997 च्या महिला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना सुमारे 90,000 लोकांनी पाहिला. या सामन्यादरम्यान मी बॉल गर्ल म्हणून होती. या सामन्याव्दारे मला कि‘केट खेळण्याची प्रेरणा मिळाली. त्या दिवसापासून माझे भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न होते, असे ती Jhulan Goswami म्हणाली.