बंद बेकायदेशीर, हिंसाचार मान्य नाही : केरळ हायकोर्ट

    दिनांक :23-Sep-2022
|
थिरुवनंतपुरम्, 
पीएफआयने पुकारलेला हरताळ आणि या काळात झालेल्या हिंसाचाराची Kerala High Court केरळ उच्च न्यायालयाने आज शुक‘वारी स्वत:हून दखल घेतली. 2019 मधील आदेशात आम्ही राज्यात हरताळ बेकायदेशीर असल्याचे जाहीर करूनही या संघटनेने तो पुकारला. आम्ही हा हरताळ बेकायदेशीर ठरवत आहोत, असे स्पष्ट करताना, हिंसाचार करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला.
 
 
Kerala High Court
 
सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान सहन केले जाऊ शकत नाही. अशा प्रकारे कुणीही बंद पुकारू शकत नाही. संपावर बंदी घालणार्‍या न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे Kerala High Court न्यायालयाने सरकार आणि पोलिसांना सांगितले.