भारत 2047पर्यंत मुस्लिम राष्ट्र करण्याचा होता कट

    दिनांक :23-Sep-2022
|
- अटकेतील आरोपींची धक्कादायक कबुली
 
नवी दिल्ली, 
भारताला 2047 पर्यंत Muslim nation मुस्लिम राष्ट्र करण्याची पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात् पीएफआयची योजना होती, अशी धक्कादायक माहिती एनआयएने गुरुवारी अटक केलेल्या काही आरोपींनी एनआयएच्या चौकशीत दिली. शरियत कायद्यानुसार भारताला 2047 पर्यंत मुस्लिम राष्ट बनवण्याचे उद्दिष्ट आम्ही निर्धारित केले होते.
 
 
NIA er
 
या देशात मुस्लिमांवर अन्याय केला जातो, अशी भावना शरियत कायद्यानुसार निर्माण केली जात आहे. यासाठी पीएफआयच्या कार्यकर्त्यांकडून मुस्लिम युवकांची माथी भडकविण्यात येत होती. मुस्लिमांना हिंदू धर्माबद्दल चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली जात होती. आपल्याला 2047 पर्यंत भारताला Muslim nation मुस्लिम राष्ट्र बनवायचेच आहे. आपला येथील संविधानावर विश्वास नाही, असे या संघटनेचे पदाधिकारी मुस्लिमांना सांगत होते. कराटे शिबिरे आयोजित करून, मुस्लिमांना तिथे कट्टरतावादाची शिकवण दिली जात होती, असे या आरोपींनी एनआयएला सांगितले. अटकेतील या सर्व आरोपींची एटीएस आणि एनआयएकडून कसून चौकशी केली जात आहे. यातून आणखीही काही माहिती समोर येऊ शकते, असे एनआयएच्या एका तपास अधिकार्‍याने सांगितले.