देशात प्रथमच सुपर बाईक रेसिंग

    दिनांक :23-Sep-2022
|
-डोरना व फेअरस्ट्रीट स्पोर्टस् यांच्यात सात वर्षांचा करार

नवी दिल्ली, 
भारतातील पहिली मोटो ग्रॅण्ड प्रिक्स स्पर्धेच्या यजमानपदासाठी उलटी गिनती सुरू होत आहे. भारत टू-व्हीलर Racing race रेसिंग शर्यतीच्या यजमानपदासाठी अनुकूल असून पुढील वर्षी भारतात प्रथमच टू-व्हिलर रेसिंगचे आयोजन होऊ शकते, असे डोरना या प्रीमियर Racing race मोटरसायकल इव्हेंटने म्हटले. नुकताच डोरनाचे व्यवस्थापकीय संचालक कार्मेलो इझलपेलेटा यांनी नोएडास्थित फेअरस्ट्रीट स्पोर्टस्सोबत सात वर्षांचा करार केला. या करारानुसार देशात प्रथमच सुपर बाईक रेसिंग ‘ग्रॅण्ड प्रिक्स ऑफ भारत’ सुरू होणार आहे.
 
 
SUPER-BIKE-RACING-1
 
आम्ही नुकताच नोएडास्थित फेअरस्ट्रीट स्पोर्टस्सोबत सात वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. गत दशकातील भारतीय दुचाकी बाजारपेठाचा अभ्यास केल्यानंतर आम्ही हा करार केला आहे. या करारानुसार ‘ग्रॅण्ड प्रिक्स ऑफ भारत’ शर्यत होणार आहे, असे कार्मेलो इझलपेलेटा म्हणाले. जागतिकस्तरावर ऑलिम्पिक व फिफा विश्वचषकानंतर मोटारसायकल शर्यती हा सर्वाधिक बघितला जाणार्‍या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे. अशी ही मोटारसायकल शर्यत ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे आयोजित केली जाणार आहे. 2011 व 2013 दरम्यान फॉर्म्युला-1 रेसिंगचे आयोजनसुद्धा केले होते, परंतु नियामक समस्या व कर विवादांमुळे रेसिंग बंद करण्यात आली.
 
 
भारत ही जगातील सर्वात मोठी दुचाकी बाजारपेठ आहे आणि मोटो ग्रांप्रीसाठी प्रबळ क्षमता आहे. देशातील दुचाकी मोटरिंग हळूहळू कमी-शक्तीच्या प्रवासी मोटरसायकलवरून उच्च-शक्तीत्या व अत्याधुनिक मोटरसायकलमध्ये अद्ययावत होत आहे, असे त्यांनी सांगितले. Racing race मोटो ग्रांप्रीमध्ये संघ असलेल्या काही आघाडीच्या कंपन्यासुद्धा भारतात असून या कंपन्यासुद्धा ‘ग्रॅण्ड प्रिक्स ऑफ भारत’ शर्यतीसाटी पुढे सरसावल्या आहेत. यात होंडा, यामाहा, सुझुकी, डुकाटी, केटीएमचा समावेश आहे. प्रायोजकांना भारतीय बाजारपेठेत विस्तार करण्याची मोठी संधी आहे, असेही ते म्हणाले.
केंद्र व उत्तर प्रदेश सरकारचा आयोजनाला पाठिंबा देण्याचे आश्वासन
केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारनेही मोटो ग्रांप्री शर्यतीच्या आयोजनाला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे, हे डोरनाचे सीईओ कार्मेलो इझलपेलेटा व राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यादरम्यानच्या भेटीवरून स्पष्ट दिसले. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह केंद्र सरकारनेही या स्पर्धेला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे, असे फेअरस्ट्रीट स्पोर्टस्चे मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्करनाथ यांनी सांगितले. या शर्यतीचे वर्गीकरण मनोरंजनाचा उपक‘म नसून क्रीडा प्रकार म्हणून केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.