मौजा महागाव येथील पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावा

- आ. कुणावारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात बैठक

    दिनांक :23-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
हिंगणघाट, 
समुद्रपूर तालुक्यातील मौजा महागाव येथील पुनर्वसनाचा (Rehabilitation) प्रश्‍नासह विधानसभा मतदार संघातील विविध प्रश्‍नांसंदर्भात आ. कुणावार यांनी जिल्हाधिकारी राहुल कार्डिले यांच्यासोबत चर्चा केली. जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दखल घेत संबंधित अधिकार्‍यांना सर्व कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले.
 
Rehabilitation
 
हिंगणघाट शहरातील सिंधी समाजातील मालमत्ता फ्रि होल्ड करून अधिकार देण्याबाबत आ. कुणावार यांना निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेत आ. कुणावार यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे हा मुद्दा उपस्थित केला. सिंधी समाजाच्या मालमत्ता पत्रकावर रिफ्युजी (शरणार्थी) असलेला शेरा काढून मालमत्ता फ्रि होल्ड करण्यासंबंधी कारवाई करण्याच्या निर्देशजिल्हाधिकारी कर्डिले यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.
 
 
सिंदी रेल्वे व समुद्रपूर येथील भूमिअभिलेख विभागा संदर्भातील प्रलंबित प्रश्‍न, कृषी विभागाचे काही मुद्दे, महावितरण, जलजिवन मिशनचा आढावा, उमेद महिला संघाचे प्रश्‍न आदी विविध प्रश्नांवर बैठकित चर्चा झाली. बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस किशोर दिघे, भाजयुमोचे अंकुश ठाकुर, जिपचे माजी अध्यक्ष नितीन मडावी, ओम राठी, आशिष पर्बत, शरद सहारे, अमोल खंदार, किशन नैबनानी, अकील शेख तसेच संबंधित विभागांचे विभाग प्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.