आता पेट्रोलनंतर सौदीला सापडला सोन्याचा खजिना

    दिनांक :23-Sep-2022
|
मदिना,
Saudi जगभरातील देशांना कच्चे तेल विकून अमाप संपत्ती कमावणाऱ्या सौदी अरेबियाने आता नवा खजिना सापडल्याचा दावा केला आहे. सौदी अरेबियाने पवित्र शहर मदिनाजवळ सोन्याचा आणि तांब्याचा खजिना सापडल्याचे म्हटले आहे. सौदी जिओलॉजिकल सर्व्हेने ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, मदिना क्षेत्राजवळील आबा अल-राहा भागात या सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. याशिवाय मदिनाच्या वाडी अल-फारा भागात 4 तांब्याच्या खाणीही सापडल्या आहेत. एका रिपोर्टनुसार, सौदी अरेबियातील हा नवीन शोध स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आकर्षित करू शकतो. यामुळे सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेला मोठी मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
 
yhtgfhfgh
 
सौदी अरेबियाचे अधिकारी म्हणतात की, या सोन्याच्या Saudi आणि तांब्याच्या खाणींमध्ये $533 दशलक्ष गुंतवणूक होऊ शकते. याशिवाय 4 हजार लोकांना कायमस्वरूपी रोजगारही मिळू शकतो. या शोधामुळे सौदी अरेबियाच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे जेव्हा जगाने तेलाला पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सौदी अरेबियाच्या भवितव्याबाबत अटकळ बांधली जात होती. अशा परिस्थितीत या शोधामुळे सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेच्या आशांना पंख फुटले आहेत. त्यामुळे सौदी अरेबियामध्ये गुंतवणुकीची नवी फेरी सुरू होईल आणि तिची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होऊ शकेल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. सौदी अरेबियामध्ये सध्या 5,300 खाणी आहेत. यातील अनेक खाणींतून मौल्यवान रत्ने व खडे वगैरे सापडतात. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी देशासाठी तयार केलेल्या 2030 च्या व्हिजननुसार खाणकाम हे देखील एक महत्त्वाचे क्षेत्र असेल. या संदर्भात सोन्याच्या खाणी मिळवून सौदी अरेबिया आपली अर्थव्यवस्था नव्याने मजबूत करू शकतो. त्याला ही ताकद तेलाशिवाय मिळेल आणि तीच ताकद दीर्घकाळ मिळेल. सौदीच्या खाण मंत्रालयाने खाण क्षेत्रात 14 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना तयार केली आहे.