काँग्रेसचा नवा अध्यक्ष कठपुतळी असणार

    दिनांक :23-Sep-2022
|
- भाजपाचा जोरदार हल्ला
 
नवी दिल्ली, 
गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीची पक्षाध्यक्षपदी निवड करण्याचे जे चित्र सध्या निर्माण केले जात असले, तरी तो केवळ एक देखावा आहे. हा नवा अध्यक्ष गांधी घराण्याच्या हातातील कठपुतळी म्हणूनच काम करणार आहे, असा जोरदार हल्ला भाजपाने आज शुक‘वारी चढविला. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते Shehzad Poonawala शेहजाद पूनावाला यांनी पत्रपरिषदेत बोलताना काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेचीच खिल्ली उडवली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत सध्या ज्या प्रकारे वक्तव्य करीत आहेत, त्यावरून तेच नवे अध्यक्ष असतील, असे संकेत मिळतात.
 
 
Shehzad Poonawala
 
या निवडणुकीनंतर सोनिया गांधी तर पूर्णपणे बाजूला होतील, मग त्या नेमके काय करणार? संपुआ सरकारच्या काळात सलग दहा वर्षे डॉ. मनमोहनसिंग हे पंतप्रधान होते, पण त्यांना काही अधिकार होते का, सोनिया आणि राहुल यांच्या आदेशानुसारच ते काम करायचे, हा देशाला आलेला अनुभव आहे. पदावर नसतानाही रिमोटच्या माध्यमातून कारभार चालविण्याची गांधी घराण्याची आजवरची परंपरा राहिली आहे आणि आताही तेच होणार आहे, असे सांगताना Shehzad Poonawala पूनावाला यांनी पी. चिदम्बरम् यांच्या अलीकडील वक्तव्याचा हवाला दिला. काँग्रेसचा अध्यक्ष कुणीही झाला तरी, राहुल गांधी हेच पक्षजनांसाठी सर्वमान्य नेते असतील, असे चिदम्बरम् यांनी सांगितले होते. नवा अध्यक्ष निवडूनही जर पक्षाची सूत्रे गांधी घराण्याच्या हातातच राहणार असतील, तर निवडणुकीचा हा देखावा करायचा कशाला, तुम्ही देशवासीयांची दिशाभूल करीत आहात, असा आरोप Shehzad Poonawala पूनावाला यांनी केला.