ट्रामाडॉलचा वापर बेकायदेशीर, गांजावर बंदी कायम

    दिनांक :23-Sep-2022
|
- 2024 पासून नियम लागू
- ‘वाडा’ने घेतले ठोस निर्णय

सिडनी,
‘वाडा’ अर्थात जागतिक उत्तेजक द्रव्य विरोधी एजन्सीने 2024 पासून स्पर्धेतील अ‍ॅथ्लिट्ससाटी प्रतिबंधित पदार्थांच्या यादीमध्ये वेदनाशामक Tramadol ट्रामाडॉलचा समावेश करणार आहे व पुनरावलोकनानंतर गांजावरील बंदी कायम ठेवली आहे. सिडनीमध्ये शुक‘वारी झालेल्या बैठकीनंतर ‘वाडा’च्या कार्यकारी समितीने हे निर्णय घेतले. समितीने सल्लागार गटाच्या शिफारशींना मान्यता प्रदान केली. अनेक देशांमध्ये तणाव व चिंतामुक्त जीवनासाठी ट्रामाडोलचा दुरुपयोग केला जात आहे. गांजाचे सेवन केले जाते. यामुळे अनेक देशांमध्ये ते नियंत्रित औषध झाले आहे, वाडाने म्हटले आहे. खेळाडूही शारीरिक कार्यक्षमता वाढविण्यासाठी ट्रामाडॉलचा वापर केली जाण्याची शक्यता वाडाने वर्तविली आहे.
 
 
WADA
 
पाठीच्या दुखापतींवर उपचार करण्यासाठी ओपिओइडचा वापर केल्यानंतर Tramadol ट्रामाडॉलचे व्यसन व त्याच्या गैरवापरामुळे मी आत्महत्येपर्यंत पोहोचलो होतो, असे अनुभव इंग्लंडचा माजी फुटबॉल गोलरक्षक ख्रिस किर्कलॅण्डने जुलैमध्ये सांगितला होता. आता 2024 पासून ट्रामाडॉलवर बंदी आणली आहे, त्यामुळे कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांना त्याचा परिणाम दिसून येईल. अमेरिकन धावपटू शाकॅरी रिचर्डसनला गांजा सेवन केल्याबद्दल टोकियो ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर शर्यतीतून बाहेर काढण्यात आले व तिच्यावर एक महिन्याची बंदी घातली. आईच्या निधनानंतर शाकॅरीने प्रतिबंधित औषधांचे सेवन केले होते. वाडाने नुकतेच क‘ीडापटूंवरील प्रतिबंधित औषध वापरावरील बंदी दोन वर्षांवरून एक ते तीन महिन्यांपर्यंत कमी केली. तथापि, काही हितधारकांच्या विनंतीनुसार वाडाने गांजावरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.