नेपाळमध्ये बस अपघात...भारतीयासह सात ठार

    दिनांक :23-Sep-2022
|
 bnhyss
 
 
बागमती,
नेपाळच्या बागमती प्रांतात बसचा accident अपघात झाला. या अपघातात एका भारतीयासह सात जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. मिळालेल्या माहितीनुसार, काठमांडूहून एक बस बीरगंजच्या दिशेने जात होती. ती बागमतीच्या मकवानपूर जिल्ह्यातील जुरीखेतजवळ पोहोचली. त्याच वेळी ती असंतुलित झाली आणि उलटली.एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकाचे नाव शरण नारायण शर्मा असून तो बिहारमधील मोतिहारी येथील रहिवासी आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सातपैकी सहा जणांची ओळख पटली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातादरम्यान सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा भीमफेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारादरम्यान मृत्यू झाला.