‘गोल्डमॅन’ विशाल जाधव शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे

- पुसद विधानसभेचे संपर्क प्रमुख

    दिनांक :25-Sep-2022
|
रवी देशपांडे 
पुसद, 
‘गोल्डमॅन’ (Goldman) म्हणून प्रसिद्ध असलेले विशाल बळीराम जाधव मूळचे पुसद तालुक्यातील लोहरा इजारा या गावचे असून ते एक दशकापासून शिवसैनिक म्हणून कार्यरत आहेत. 2014 ची विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून पुसद विधानसभा मतदारसंघातून लढविली होती. या दरम्यान, त्यांनी सर्व तांडे आदिवासी वाड्या, पुसद शहर आणि तालुक्यातील गावे पिंजून काढली होती.
  
Goldman
 
निवडणूक प्रचाराच्या आकर्षक शैलीमुळे ते लोकप्रिय ठरले होते. परंतु ही लोकप्रियता त्यांना मतदानात परिवर्तित करता आली नसली तरी 2014 नंतर त्यांनी लोहरा इजारा येथे स्थाणिक होऊन शिवसेनेचे कार्य सुरूच ठेवले. एवढ्यात शिवसेनेत उभी फूट पडून शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट अशी विभागणी झाली. विशाल जाधव मात्र सुरुवातीपासून ठाकरे गटात आहेत. नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अ‍ॅड. विशाल जाधव यांची पुसद तालुका संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
 
 
विशाल जाधव (Goldman) यांनी शिवसैनिक म्हणून पुसद विधानसभा मतदारसंघातील अनेक गावात सदस्य नोंदणी युद्धपातळीवर करून शिवसेना गाव, तांडे, आदिवासी वाड्यात संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली असून एक कृतिशील कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. पुसद मतदारसंघ बंजाराबहुल असून विशाल जाधव बंजारा समाजातील होतकरू सुशिक्षीत युवा नेतृत्व आहे. येणार्‍या काळात शिवसेना ठाकरे गटाचे कार्य ते अधिक जोमाने करतील, अशी भावना जनमानसात व्यक्त होत आहे.