408 स्थळी नवदुर्गा स्थापना

- शारदोत्सवची संख्या 423

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
गोंदिया, 
नवदुर्गा (Navadurga) उत्सवाची सुरुवात 26 सप्टेंबर सोमवारपासून होत आहे. नवरात्र उत्सव जिल्ह्यात मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात येतो. या उत्सवात महिलांच्या सक्षमीकरणापासून तर लोक मनोरंजनातून जनजागृतीपर्यंतचे काम या उत्सवातून करण्यात येते. यंदा जिल्ह्यात 408 ठिकाणी दुर्गादेवीची मूर्ती तर, 423 ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे.
 
Navadurga
 
गोंदिया शहर पोलिस ठाण्यांतर्गत दुर्गा (Navadurga) स्थापना 35 व शारदा 14, रामनगर दुर्गा व 22 शारदा 25, गोंदिया ग्रामीण दुर्गा व 40 शारदा 30, रावणवाडी दुर्गा व 45 शारदा 25, तिरोडा दुर्गा 30 व शारदा 12, गंगाझरी दुर्गा 30 व शारदा 15, दवनीवाडा दुर्गा 14 व शारदा 4, आमगाव दुर्गा 40 व शारदा 20, गोरेगाव दुर्गा 55 व शारदा 40, सालेकसा दुर्गा 35 व शारदा 15, देवरी दुर्गा 8 व शारदा 50, चिचगड दुर्गा 8 व शारदा 30, डुग्गीपार दुर्गा 15 व शारदा 55, अर्जुनी मोर दुर्गा 22 व शारदा 40, नवेगावबांध दुर्गा 4 व शारदा 23, केशोरी दुर्गा 5 तर 25 शारदांची स्थापना करण्यात येणार आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण 408 दुर्गा व 423 शारदा मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे.
 
 
चौक बंदोबस्तासाठी पथक
गावातील सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने पुढाकार घेतला आहे. यासाठी तंटामुक्त समिती त्यांनी आपापल्या गावात ग्राम सुरक्षा दल सज्ज केले आहे. जिल्हा पोलिसांकडून पथके तयार करण्यात आली आहेत. यंदा दंगल नियंत्रक पथक ठेवण्यात आले आहेत. 36 जणांचे दोन शीघ्रकृतिदल 10 बिट मार्शल, 2 निर्भया पथक, 4 उपविभागीय अधिकार्‍यांकडे प्रत्येकी एक ट्रंकिंग फोर्स पोलिस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रत्येकी 1 ट्रेकिंग फोर्स असे 6 फोर्स तयार करण्यात आले आहेत. त्यात 6 अधिकारी व 50 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. 2 सी 60 चे पथक राहणार आहेत. शिवाय बॉमसोधनाशक पथकही नेमण्यात आले आहेत. 320 पुरुष होमगार्ड तर 55 महिला होमगार्ड बंदोबस्तासाठी लावण्यात येणार आहे.
 
 
आरोग्य विभागाचा ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ उपक्रम
नवरात्र उत्सवानिमित्त आरोग्य विभागामार्फत विशेष मोहीम ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमे दरम्यान गरोदर माता, 18 वर्षावरील सर्व महिलांची गर्भसंस्कार शिबिर, आयर्न शुक्रोज उपचार शिबिर, आहार व पोषण समुपदेशन सत्र, सोनोग्राफी तपासणी कॅम्प, अंगणवाडीतील मुलांची तपासणी, शाळेतील मुलांची तपासणी, मानव विकास शिबिर, कोविड लसिकरण सत्रे इत्यादी विविध उपक्रम राबवून महिलांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.