अर्जुनी मोर तालुक्यात गजराजची झुंड व नरभक्षी वाघाची दहशत

गावक-यांना जंगल परिसरात न जाण्याचा ईशारा
वनविभागाचा अलर्ट, गावागावात दिली जाते दवंडी

    दिनांक :25-Sep-2022
|
अर्जुनी मोर,
 गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात वास्तव्यात Arjuni Mor  असलेले गजराज (हत्ती ) गोंदिया जिल्ह्यात दाखल झाले आहेत. शंकरपूर बोळदे मार्गे ते शनिवारी दिनांक 24 अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या खोडदा गावानजीक च्या जंगलात अनेकांनी बघितले आहेत. काही प्रमाणात शेतातील धान पिकाचे नुकसान केले तेही सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यात व भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात धुमाकूळ घातलेला सिटी वन नरभक्षी वाघ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ghg 
 
आसाम राज्यातील माहूत महाराष्ट्रातील Arjuni Mor  लोकांना पूर्वी गजरातचे दर्शन घडवीत असत मात्र आता प्रत्यक्षात गजरातचे दर्शन म्हणजे या परिसरातील लोकांना एक पर्वणीच ठरावी असे आहे. त्यामुळे स्थानिकांची गजराच्या दर्शनासाठी रीग लागली होती. काहींना दर्शन घडले तर काहींचा हीरमोड झाला. गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याकडे आगे कूच केल्याची सूचना वन विभागाला यापूर्वीच होती. केशोरीच्या वनक्षेत्रपालांनी खबरदारीची सूचना एका पत्राद्वारे सरपंचांना दिली होती. गजराज यांच्या प्रवेश शुक्रवारी रात्री बोळदा येथून झाल्याचे समजते. बोडदा हे गडचिरोली गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर असून ते गडचिरोली जिल्ह्यात येते तर खोडदा हे गाव गोंदिया जिल्ह्यात येते खोडदा ते बोडदा दरम्यानच्या जंगलात लोकांनी गजराज बघितले आहेत .येथील शेत शिवारात धान पिकाचे नुकसान केले तेही सांगण्यात येते. खोडदा नजीक गाढवी नदी आहे हे गजराज नदी ओलांडून बोरी या गावाकडे कुच करतात की वडेगाव बंधामार्गे केशोरी कडे वळतात यावर वन विभाग लक्ष ठेवून आहे. येथूनच ते माघारी सुद्धा परतण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुमारे वीस गजराजांची ही झुंड असल्याचे सांगितले जाते . त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनपरिषेत्रातील सिटी वन नरभक्षी वाघ गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात केशोरी वनपरिक्षेत्रात दाखल झाला आहे. त्यामुळे वन व वन्यजीव विभागाने जंगलात असलेल्या गावकऱ्यांना जंगल परिसरात न जाण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच ग्रामपंचायतींनी या संदर्भात दवंडी देऊन जनजागृती करण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे केशोरी परिसरात सिटी वन नरभक्षी वाघाची दहशत निर्माण झाली आहे.
 
 
सिटी वन या वाघाने Arjuni Mor  गडचिरोली जिल्ह्यातील तीन ते चार जणांचा बडी घेतला आहे. या वाघाने गडचिरोली जिल्ह्यात मागील आठवडाभर चांगला धुमाकूळ घातला होता. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान हा वाघ आता गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यातील केशोरी वनपरिक्षेत्रातील जंगलात दाखल झाला आहे. वन विभागाचे कर्मचारी आणि गावकऱ्यांना हा वाघ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव वनक्षेत्रात आढळला. हा वाघ नरभक्षी असल्याने त्याच्यापासून गावकऱ्यांचे जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन व वन्यजीव विभागाने या परिसरातील सर्व ग्रामपंचायतींना शनिवारी तारीख 24 पत्र देऊन सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच लाकडे, गुरे, चराई आणि इतर कामांसाठी जंगल परिसरात जाण्यास गावकऱ्यांना सक्त मनाई केली आहे .या संदर्भात ग्रामपंचायतीने गावात दवंडी देऊन गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत. सिटी वन वाघ केशोरी परिक्षेत्रात दाखल झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे सध्या खरीप हंगामातील धानातील निंदन काढण्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी सकाळपासूनच शेतावरच असतात. अशात आता सिटी वन वाघ या परिसरात दाखल झाल्याने शेतकऱ्यांवर शेतीचे कामे बंद ठेवण्याची वेळ आली आहे
 
 
केसरी वनपरिक्षेत्रात Arjuni Mor  सिटी वन हा नरभक्षी वाघ दाखल झाला आहे तर गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेतून हत्तीचा कळप सुद्धा या परिसरात येण्याची शक्यता आहे त्यामुळे गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे सूचना केल्या असून जंगल परिसरात गुरे चराई लाकडे आणण्यासाठी व इतर कामासाठी झाल्यास मनाई केली आहे नागरिकांना सूचना केली आहे. सी. व्ही. नान्हे वनक्षेत्र सहाय्यक केशोरी.