अखेर मजीतपूर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक निलंबित

- आ. रहांगडालेंनी मिळवून दिला आदिवाशी विद्यार्थ्याना न्याय

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
तिरोडा, 
आश्रमशाळेतील (Ashram School) आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी एसटी बसने ने-आण करणे गरजेचे असतांना तब्बल 120 विद्यार्थ्यांना खासगी वाहनामध्ये जवानरांसारखे कोंबणार्‍या मजीतपूर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकाला निलंबिनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. आ. विजय रहांगडाले यांच्या पाठपुराव्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात आदिवासी विभाग अप्पर आयुक्त यांना तसे आदेश दिले.
 
Ashram School
 
जिल्ह्यातील मजीतपूर येथे आदिवासी विभागाची माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा (Ashram School) नियमितरित्या सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा याकरिता 22 ते 24 सप्टेंबरपर्यंत तिरोडा तालुक्यातील कोयलारी येथे आयोजीत क्रीडा स्पर्धेकरिता मजीतपूर येथील उच्च माध्यमिक गटातील 120 विद्यार्थी सहभागी झालेग़ोते. या सहभागी विद्यार्थ्यांची संपूर्ण जवाबदारी ही मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकाची होती. परंतू मजीतपूरचे मुख्याध्यापक एस. के. थूलकर व क्रीडा शिक्षक एन. टी. लिल्हारे यांनी आपल्या कर्त्यव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आले. सहभागी विद्यार्थ्यांना ने-आन करण्याकरिता बसची सुविधा करणे गरजेचे होते. परंतू मुख्याधापकातर्फे बसची सुविधा न पुरविता खाजगी मिनी मालवाहक (407) करण्यात आले.
 
 
24 सप्टेंबर स्पर्धा संपताच या 120 विद्यार्थ्याना या मालवाहकामध्ये जनावरांप्रमाणे कोंबून आणण्यात आले. परिणामी विद्यार्थ्याना प्राणवायूची कमतरता जाणू लागली व एकोडीजवळ 12 विद्यार्थ्याची प्रकृती खालावली. त्यांच्यावर एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करण्यात आले. त्यापैकी एका विद्यार्थिनीला गोंदिया येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. या प्रकरणाची माहिती मिळताच आमदार विजय रहांगडाले यांनी तातडीने आश्रमशाळेत भेट देऊन हलगर्जीपणा करणार्‍या दोषी शिक्षकांवर कार्यवाही करण्याबाबत आदिवासी विभाग अप्पर आयुक्त यांना आदेश दिले. यावर अवघ्या अर्ध्या तासात अप्पर आयुक्त यांनी मुख्याध्यापक एस. के. थुलकर व क्रीडा शिक्षक एन. टी. लिल्हारे यांना निलंबित केले आहे.
 
 
पालकमंत्र्यांनी घेतली दखल
मजीतपूर येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा ट्रकमध्ये बसून प्रवास या घटनेची गंभीर दखल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली असून या घटनेच्या चौकशीचे दिले आहेत. त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विद्यार्थ्यांना तात्काळ उपचार मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत.