भाजपा कार्यकर्त्यांनी 20 घरांचे पालकत्व घ्यावे

- चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन
- देवळी येथे भाजपाचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
देवळी, 
भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने (BJP workers) जनकल्याणाची भावना मनात ठेऊन काम करण्याची गरज असून सोबतच पक्षाच्या बळकटीकडे लक्ष द्यावे. सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने 20 घरांचे पालकत्व घ्यावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
 
BJP workers
 
देवळी येथील नगर परिषद क्रीडा संकुलात आयोजित जिल्हा कार्यकर्ता (BJP workers) मेळावा व सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी भाजपाचे विदर्भ संघटन महामंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, आ. डॉ. पंकज भोयर, आ. दादाराव केचे, आ. रामदास आंबटकर, भाजपा प्रदेश सचिव राजेश बकाने, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, माजी खा. सुरेश वाघमारे, सुधीर दिवे, भैय्याजी शहाणे, अंकुश ठाकूर, वरुण पाठक, शोभा तडस, उमेश अग्नीहोत्री यांच्यासह मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून द्यावा. 21 व्या शतकात भारताला विश्वगुरू होण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. ते पूर्ण करण्यासाठी मोदीजींचे हात बळकट करावेत. वर्धा जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना व वंचितांना घरे व आरोग्याच्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. मविआ सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू होता, अधिकार्‍यांना शिविगाळ करून व दबाव टाकून चुकीची कामे करवून घेतली जात होती. अनैतिक धंद्यांना उधान आले होते. केवळ आपल्या हिताचा व पोट भरण्याचा विचार केला. आता सत्ता बदलल्यावर परिस्थिती बदलली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 
40 जिप सदस्य निवडून आणू
वर्धा जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत भाजपाचे 40 सदस्य निवडून येण्यासाठी सर्व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी लागणारी सर्वप्रकारची मदत करणार व प्रचारासाठी येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. नगर पालिकेत नगराध्यक्ष व ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाची थेट निवडणुकीचा निर्णय घेतल्याने जनतेने त्याला स्वीकारले असून भाजपाला ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे यश मिळाले असल्याचे ते म्हणाले.
 
 
काँग्रेसचे ढगे, स्वाभिमानीचे अग्नीहोत्री भाजपात
मेळाव्या दरम्यान वर्धा जिल्हा काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते (BJP workers) नाना ढगे व स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक उमेश अग्नीहोत्री यांनी भाजपात प्रवेश घेतला. या दोन्ही नेत्यांच्या कामाची दखल घेतली असून जनतेची कामे करण्यासाठी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे जाहीर केले.
 
 
ओबीसी आरक्षण मिळवून दिले
मविआ सरकारने ओबीसींचे 27 टक्के आरक्षण गमावले. 12 बलुतेदार, 18 पगडजातींना लाभापासून वंचित ठेवण्याचे काम केले. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच त्यांनी पहिला निर्णय ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठीचा घेतला. त्यानंतर कोर्टाने आरक्षण बहाल केले. यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी समाजाला न्याय मिळाला आहे. शेतकर्‍यांचे पैसे येत आहेत. अनेक जनहिताचे निर्णय सरकार घेत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.