हिंगणघाटच्या महारक्तदानाची बावणकुळे यांनी घेतली दखल

    दिनांक :25-Sep-2022
|
हिंगणघाट, 
आ. समीर कुणावार यांच्या मार्गदर्शनाखाली महारक्तदान (Blood donation) शिबिर महायशस्वी करणारे भाजयुमो प्रदेश सचिव अंकुश ठाकुर यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावणकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिबिरात सुमारे ३३४ रक्तदात्यांनी रक्तदान करुन इतिहास रचला. सेवा पंधरवाड्याअंतर्गत हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात संपन्न झालेल्या महारक्तदान शिबिर संपुर्ण महाराष्ट्रातून अव्वल ठरले असून वर्धा जिल्ह्यातील त्याचप्रमाणे हिंगणघाट शहराच्या रक्तदान शिबिरांच्या इतिहासातील हि सर्वोच्च संख्या आहे.
  
Blood donation
 
या यशस्वी शिबिरांच्या आयोजनाकरीता आमदार समीर कुणावार यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेणारे भाजयुमो प्रदेश सचिव अंकुश ठाकुर यांचे देवळी येथील जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणा-या भाजपा महामंत्री किशोर दिघे,कविश्वर इंगोले,सोनू पांडे, तुषार येणोरकर, तुषार हवाईकर, आकाश पोहाणे,संजय डेहणे, सुनील डोंगरे, विनोद विटाळे, गौरव तांबोळी शंकर मोरे योगेश जिकार, विठ्ठू बेनिवार, रजत भुरे, विक्की बारेकर, राहुल दारुणकर,स्वप्नील सुरकार,महिला आघाडीच्या तसेच सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सहका-यांचे अंकुश ठाकुर यांनी आभार मानले.