बुलढाणा भाजपातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

    दिनांक :25-Sep-2022
|
बुलडाणा, 
मानववादाचे प्रणेते भारतीय संस्कृतीचे गाढे Deendayal Upadhyay vअभ्यासक,थोर चिंतक व विचारवंत तसेच जनसंघाचे संस्थापक स्वर्गीय पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज दि. 25 सप्टेंबर भाजपा जनसेवा कार्यालय बुलढाणा येथे विनम्र अभिवादन करण्यात आले.भाजपा जिल्हा उपाध्यक्षा विजया राठी व भाजपा जिल्हा सचीव बाबासाहेब वरणगावकर यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
 

hgfh 
 
याप्रसंगी कार्यकमाच्या अध्यक्ष स्थानी भाजपा Deendayal Upadhyay शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा होते. यावेळी भाजपा शहर सरचिटणीस आशिष व्यवहारे,भाजपा शहर उपाध्यक्ष नारायण तोंडीलायता, माजी नगरसेवक अरविंद होंडे,नितीन दासर,नितीन बेंडवाल ,भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष सोहम झाल्टे, शहर सरचिटणीस मोहित भंडारी,भाजपा शहर सचिव सचिन जोशी,नितीन श्रीवास,सर्जेराव देशमुख,श्रीकृष्ण मख यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.