पंकजाताईंच्या नेतृत्वात सावरगाव दसरा मेळाव्याला उपस्थित रहा - डॉ सुनिल कायंदे

    दिनांक :25-Sep-2022
|
देऊळगावराजा, 
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या आठवणींना जागृत करण्या साठी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात येत्या 5 ऑक्टोबर रोजी सावरगाव जिल्हा बीड येथे होणार्‍या दसरा मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित रहा असे आवाहन बुलढाणा जिल्हा दसरा मेळावा कृती समितीचे संयोजक डॉ. सुनील कायंदे यांनी केले आहे.
 

fgf  
 
 
 
दसरा मेळावा कृती समितीचे संयोजक युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ सुनील कायंदे यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरवर्षीप्रमाणे येणार्‍या दसरा मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने सावरगाव दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ सुनिल कायंदे संवाद साधताना म्हणाले ऊसतोड कामगार कष्टकरी शेतकरी यांना न्याय देण्यासाठी,अठरापगड जाती मध्ये स्वाभिमान जागृत करण्याच्या दृष्टीने लोकनेते स्व गोपीनाथराव मुंडे साहेबांनी भगवान बाबा यांनी सुरू केलेली दसरा मिळाव्याची परंपरा कायम राखली होती. सन 2014 मुंडे साहेबांच्या अकाली निधना नंतर त्यांच्या कन्या लोकनेत्या पंकजा मुंडे यांनी ही परंपरा पुढे कायम ठेवली.मध्यंतरी भगवानगडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री महाराज यांनी भगवानगडावर कुठलेही राजकीय व सामाजिक मिळावे होणार नाही अशी भूमिका घेतली.मात्र दसरा मेळावा ही स्वाभिमानी परंपरा खंडित होता कामा नये म्हणून समाजा च्या आग्रहास्तव दसरा मेळावा ही परंपरा कायम ठेवू अशी भूमिका पंकजा घेतली यासाठी नामदेव शास्त्री महाराज यांच्या निर्णया चे सन्मान राखून पंकजा मुंडे यांनी भगवान बाबा यांचे जन्मगाव सावरगाव (जिल्हा बीड) येथे दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला.मुंडे साहेबांच्या आठवणी जागृत करण्या साठी लोकनेते पंकजा मुंडे यांच्या हाके ला प्रतिसाद देऊन सावरगाव दसरा मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कृती समितीचे संयोजक सुनील कायंदे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.