‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ : एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
यवतमाळ, 
हरीकिसन जाजू एज्युकेशन संस्था संचालित, कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स येथील आयक्यूएसी विभागामार्फत ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ (Faculty Development Programme) या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार, 24 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य रितेश चांडक होते.
 
Faculty Development Programme
 
कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. सुनील चिंते व प्रा. मीनल शेंडे होते. ही कार्यशाळा ‘क्लाऊड कम्प्युटिंग’ या विषयावर आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात क्लाउड कम्प्युटिंगबद्दल माहिती देण्यात आली. तर कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात क्लाऊड स्टोरेजच्या माध्यमातून डेडा व्यवस्थापन कशा प्रकारे करू शकतो याचे मार्गदर्शन केले. कार्यशाळेला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी उपस्थिती राहून सहभाग नोंदविला. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजन करण्याकरिता सर्व विभाग प्रमुखांचे सहकार्य लाभले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेचे सचिव आशिष जाजू यांनी कौतुक केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. सुधीर वेळूकर यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. अतुल शिंगरवाडे यांनी केले.