काढणीत्तोर व्यवस्थापनासाठी अर्थसहाय योजना

-एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

    दिनांक :25-Sep-2022
|
अकोला,
फलोत्पादन पिकांचे मूल्यवर्धन व प्रक्रिया करूनFinancial assistance  शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पिके व पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध व्हावा याकरिता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांना प्रोत्साहन व अर्थसहाय दिले जात आहे. त्यात एकात्मिक पॅक हाऊस, पूर्व शीतकरण गृह, शीतखोली शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पांची उभारणीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते.

ytut 
 
उत्पादित फलोत्पादन, औषधी, सुंगधी मालाचीFinancial assistance साफसफाई, प्रतवारी व पॅकिंग करुन दर्जा कायम ठेवून साठवणूक कालावधी वाढवणे तसेच मोठया प्रमाणावर फलोत्पादन पिकांच्या मालाची आवक वाढवून योग्य बाजारमूल्य शेतकर्‍यांना मिळवून देण्यासाठी काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांना प्रोत्साहन व अर्थसहाय्य दिले जाते. या घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्थसहाय योजनासाठी शेतकर्‍यांनी अर्ज करावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे येथील संचालक डॉ. के. पी. मोते यांनी केले.