चैतन्य अर्बनची वार्षिक आमसभा

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
यवतमाळ, 
General Meeting : सभासदांनी सभासदांसाठी सभासदांद्वारा संचालित आर्थिक संस्था म्हणजेच सहकारी पतसंस्था. चैतन्य अर्बन यवतमाळ ही औपचारिक विधीवत संस्था जरी असली तरी मुलत: हे परस्पर विश्वास, प्रेम व आपुलकीने बंदिस्त एक विस्तारित कुटुंबच आहे. दोन वर्षांचा कोरोनाच्या नकोशा कालखंडानंतर यावर्षी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा (General Meeting) रविवार, 18 सप्टेंबरला संभाजी नगर चैतन्य शाळेजखळील गणपती मंदिरात उत्साही व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली.
  
General Meeting
 
चैतन्यचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील यांच्या धडाडीच्या कुशल व तडफदार नेतृत्वाला समर्पक साथ देणार्‍या त्यांच्या सुविद्य सहधर्मचारिणी वृषाली पाटील यांनी आत्मियतेने व जिव्हाळ्याने नियोजित व संचालित या उत्सवास सर्व संचालक, कर्मचारी, भागधारक, हितचिंतक व विशेष सन्माननीय अतिथी आवर्जून उपस्थित होते. यावर्षी सर्वसाधारण सभेस प्रमुख अतिथी म्हणून सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त प्राचार्य नगराळे तथा सहकारी बोर्डचे अधिकारी चंदन व संभाजीनगरचे लोकप्रिय नगरसेवक सुजीत राय लाभले होते.
 
 
संस्थेच्या अहवालाचे वाचन चैतन्यचे मुख्य कार्यापालन अधिकारी जगदीश धोबे यांनी केले. चैतन्य अर्बनचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील यांनी संस्थेच्या एकंदरित प्रगतीचा विस्तृत आढावा व भविष्यातील योजना व नियोजन यांचा परामर्श सर्व उपस्थितांच्या आकांक्षा व अपेक्षा यांना फलद्रूप करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. चैतन्यच्या मुग्धा मोहगावकर यांनी केलेल्या ओघवत्या निवेदनाने व चैतन्यच्या व्यवस्थापक किरण बांद्रेकर यांच्या सर्वंकष आभारप्रदर्शनाने व चैतन्यच्या उज्ज्वल परंपरेनुसार स्नेहभोजनाने या उत्सवी व उत्साही पर्वाची सांगता झाली.