वेगळया विदर्भाशिवाय विकास अशक्य- जुगलकिशोर कोठारी

    दिनांक :25-Sep-2022
|
वाशीम, 
विदर्भावर सातत्याने अन्यायची श्रृंखला सुरू आहे. Jugalkishore Kothari  विदर्भामध्ये सर्वबाबी उपलब्ध असूनही काही विरोधी मानसिकतेमुळे अद्यापही वेगळया विदर्भाची सर्वात जुनी मागणी असतानाही त्यास न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता गावस्तरापासून लोकचळवळ उभारून केंद्र सरकारवर दबाव आणणे जरूरी आहे. सर्वसामान्यांची भावना वेगळया विदर्भासोबत असून, जोपर्यंत विदर्भ वेगळा होत नाही तोपर्यंत कुठलाही विकास शक्य नाही, असे प्रतिपादन व्यापारी मंडळाचे जिल्हाध्यक्ष विदर्भवादी जुगलकिशोर कोठारी यांनी पत्रकार परिषदेत केले.
 

gfh 
 
 
 
अखंड महाराष्ट्राचा भ्रमजाल Jugalkishore Kothari निर्माण करून लोक चळवळीपासून अलिप्त करण्याचा डाव काही संधीसाधू करीत आहेत. जर विदर्भ वेगळा झाला तर आपण ही विज दुसर्‍यांना विकू शकतो. जर आज आपण जागृत होवून या आंदोलनात भाग घेतला नाही तर भविष्याची पुढची पिढी कधीच माफ करणार नाही. विदर्भाला विरोध करणारे आता विदर्भाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका मांडत आहेत. रणनितीकार प्रशांत किशोर यांनी वेगळया विदर्भाची चळवळ हाती घेतल्यामुळे आता या लढाईला बळ मिळाले आहे. नागपूर येथे २० सप्टेंबर रोजी प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनात विदर्भावाद्याची कार्यशाळा पार पडली. त्यामध्ये विदर्भातील ५० कार्यकर्ते व पुढारी निमंत्रीत करण्यात आले होते. गत शंभर वर्षापासून सुरू असलेल्या या लढ्याला आता न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचा संकल्प यावेळी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी घेतला. यावेळी शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर यांनी सांगीतले की, सर्वात जास्त धान्य व विजेची निर्मीती विदर्भात होते. वेगळया राज्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी विदर्भाकडे आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी विदर्भाचा बळी दिल्या जात आहे. त्यामुळे रणनितीकार प्रशांत किशोर यांनी या अन्यायाविरूध्द अभ्यास करून विदर्भाच्या बाजूने रणशिंगे फुंकले आहे. पत्रकार परिषदेस जुगलकिशोर कोठारी, रमेशचंद्र बज, गजानन अहमदाबाकर व आदिंची उपस्थिती होती.