देवळीत औषधीय घनकचरा उघड्यावर

    दिनांक :25-Sep-2022
|
देवळी, 
Medicinal solid येथील गांधी चौकातील एका रिकाम्या भूखंडावर अनेक वर्षापासून औषधीय घनकचरा उघड्यावर टाकला जात असल्याची गंभीर बाब उघडकिस आल्याने देवळी नगर परिषद आणि जिल्हा अन्न व औषध विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे.त्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे भूखंडावरील हा जीवघेणा घनकचरा देवळी नगरपालिकेकडून उचलला जातो. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाचे या प्रकाराला अभय असल्याचे दिसून येते.
 
 
bhgta
गांधी चौकातील मुख्यरस्त्यावर नवदुर्गा मंदिरकडे जाणाऱ्या गल्लीच्या कोपऱ्यात चांडक यांच्या मालकीचा रिकामा भूखंड आहे. त्याभूखंडावर परिसरातील नागरिक अनेक वर्षापासून घरातील शिल्लक खाद्यपदार्थ टाकतात त्यामुळे तिथे नेहमी मुक्या जनावरांचा वास असतो.याकडे दुर्लक्ष करून तिथे Medicinal solid औषधीय घनकचरा टाकण्याच्या या संतापजनक घटनेचा परिसरातील नागरिकांनी निषेध केला आहे.या जीवघेण्या घनकचऱ्यात वापरलेल्या इंजेकशनच्या सुयांचा खच तसेच अर्धवट औषधीच्या बाटल्यांचा ढीग दिसून येत आहे. मागच्या काही महिन्यापासून अनेक जनावरांना विषबाधा होऊन ते मृत झाल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या भूखंडाच्या 25 मीटर अंतरावर प्राथमिक शाळा आहे. तेथील विद्यार्थी खेळण्यासाठी कचऱ्यातील रिकाम्या बाटल्या वेचतांनाचे चित्र अनेकदा दिसून येते.
या भूखंडाशेजारी एका प्रथितयश डॉक्टरचा दवाखाना आणि त्याच्या कुटूंबाच्या स्वमालकीचे Medicinal solidऔषधी दुकान असून तेथील कर्मचाऱ्यांना दिवसाढवळ्या हा घनकचरा फेकतांना अनेकांनीं पाहिलेले आहे. देवळी नप प्रशासन काहीच कारवाई करीत नसल्याने हा चिरमिरीचा प्रकार असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. औषधी दुकानातील कालबाह्य औषधीसाठा आणि दवाखान्यात वापरल्या गेलेल्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याची काही शासकीय निकष असतांना ते उघड्यावर फेकले जात आहे. जिल्ह्याचे अन्न व औषधी विभागाचे Medicinal solid अस्तित्व काय फक्त मासिक वसुलीपुरतेच शिल्लक आहे की काय, अशी शंका नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.