पद जाणार असल्याने नाना पटोले भयग्रस्त

- भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता यांचा टोला

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
अमरावती, 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे पद जाणार असल्यामुळे पटोले स्वतःच भयग्रस्त असल्याने व आपले पद वाचवायचे असल्यामुळे वैफल्यग्रस्तेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणे हा त्यांचा नाईलाज आहे, असा पलटवार भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी केला.
 
nivedita chaudhary
 
नाना पटोले यांनी अमरावती येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर उतरून टीका केली. पंतप्रधान पद हे देशाचे असते, याचे भान नाना पटोले यांच्यासारख्या नेत्याला नाही. आपल्या भाषणात पंतप्रधानाचा एकेरी भाषेत त्यांनी उल्लेख केला, याचा निषेध भाजपाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन केला. कोविड काळात करोडो रुपयांचा भ्रष्ट्राचार जिल्हा स्त्री रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात महाविकास आघाडी सरकारने केला. फायर ऑडिटमध्ये घोळ केला. त्यामुळे विपरिात घटना घडली आहे. देवेंद्र फडणवीस अतिशय कार्यक्षम असून अमरावतीचे पालकमंत्री म्हणून अतिशय योग्य कामगिरी बजावतील. काँग्रेसच्या पालकमंत्री खंडणीखोर होत्या, त्यांनी अमरावती जिल्हा माफियांना विकला होता. यापुढे नाना पटोले यांनी तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा भाजपा त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा निवेदिता चौधरी यांनी दिला आहे.