श्रींचा नवरात्र महोत्सव उद्यापासून

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
यवतमाळ, 
Navratri Festival : बालाजी सोसायटीतील श्रीबालाजी देवस्थानात सोमवार, 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरदरम्यान श्रीबालाजींचा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. घटस्थापनेनंतर रोज सकाळी श्री बालाजीला अभिषेक पंचसूक्त पवमान होईल. भक्तांना 251 रुपये देऊन अभिषेकासाठी नाव नोंदविता येईल.
 
Navratri Festival
 
रविवार, 2 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजता कन्यका पूजनाचा (Navratri Festival) कार्यक्रम होईल. त्यात तेजस्विनी छात्रावासातील गरीब होतकरू आत्महत्याग्रस्त मुलींना ड्रेस, स्कूलबॅग, शिलाईसाठी पैसे, वह्या, सौंदर्य प्रसाधने, पेन, मिठाई हे साहित्य कार्यक्रमाच्या प्रायोजक महिलांच्या हस्ते मुलींना ओवाळून त्यांना भेट म्हणून देण्यात येते. दरवर्षी छात्रावासातील सर्व मुलींना भेटवस्तू दिल्या जातात. प्रत्येक मुलींचे प्रायोजकत्व महिला भक्तांद्वारे घेतल्या जाते. वसतीगृहाच्या व्यवस्थापकांचाही सत्कार केला जातो.
 
 
सिमोल्लंघन बुधवार, 5 ऑक्टोबरला संध्याकाळी 5.30 वाजता विजयादशमी (दसरा) निमित्त श्रीबालाजींची पालखी मंदिरातून निघून प्रगती सोसायटी, महादेव नगरमार्गे काळे लेआऊटमधील हनुमान मंदिराच्या प्रांगणात पोहचेल. तेथे यथाविधी सिमोल्लंघनाचा कार्यक्रम व सोने लुटण्याचा कार्यक्रम होऊन पालखी रामनगर, लक्ष्मीनगर, बालाजी सोसायटीमार्गे देवस्थानात परत येईल. सभागृहात आरती, प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता होईल. सर्व नागरिक बंधू-भगिनी भाविकांनी या पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, अशी विनंती बालाजी देवस्थानतर्फे अध्यक्ष विनोद देशपांडे व सर्व विश्वस्तांनी केले आहे.