अंबा व एकविरा देवीचा उद्यापासून नवरात्रोत्सव

- दोन्ही संस्थानची जोरात तयारी
- पोलिसांचा राहणार तगडा बंदोबस्त

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
अमरावती, 
Navratri festival : विदर्भाची कुलस्वामिनी अमरावतीची ग्रामदेवता श्री अंबा व एकविरा देवीचे यंदाचे अश्विन नवरात्र सोमवार, 26 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. गत दोन वर्षाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यंदा निर्बंध बरेचसे शिथील झाले असल्याने भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन दोन्ही मंदिर संस्थाने जय्यत तयारी केली आहे.
  
Navratri festival
 
दोन्ही मंदिरात महिला व पुरूषांना स्वतंत्र व्यवस्थेसह प्रवेश दिला जाणार आहे. स्त्रियांसाठी ओटी भरण्यासाठी दर्शन सभागृहाबाहेरच स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. वृध्द, अपंग, दिव्यांगांसाठी वेगळी व्यवस्था आहे. भक्तांसाठी प्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अंबादेवी मंदिरात सोमवार, 26 सप्टेंबरला पहाटे 5 वाजता सचिव अ‍ॅड. दि. मा. श्रीमाळी यांच्या हस्ते अंबादेवीला अभिषेक करून घटस्थापना होईल. सकाळी 7.30 वाजता सचिव रवींद्र कर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.
 
 
महानवमीचा होम मंगळवार, 4 ऑ्नटोंबर रोजी दुपारी 12 पासून सुरू होईल. यंदाचे यजमान डॉ. जयंंत पांढरीकर तसेच अशोक खंडेलवाल आहेत. परंपरेप्रमाणे बुधवार, 5 ऑ्नटोंबरला दुपारी 4 वाजता श्री अंबादेवीची पालखी हजारो भाविकांसह सीमोल्लंघनास जाईल. 26 सप्टेंबर ते 4 ऑ्नटोंबर या काळात सचिन देव महारांजाचे ‘श्री गुरूचरित्र व गुरूमहिमा’ प्रवचन श्री अंबादेवी कीर्तन सभागृहात दररोज सकाळी 8.30 ते 9.30 या वेळात होईल. या शिवाय दररोज चार भजनी मंडळाच्या भजनांच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.
 
 
एकविरा देवी मंदिरात सकाळी 7.30 वाजता घटस्थापना (Navratri festival) होणार असून 10 वाजता ध्वजारोहण होईल. तसेच दररोज सकाळी 4 ते 6.30 पर्यंत अभिषेक षोडषोपचार व श्रुंगार आरती होईल. 26 ते 4 ऑक्टोबर दरम्यान दररोज विविध भजीन मंडळांचे भजन, सांयकाळी प्रवचन व हभप मकरंद करंबेकर यांचे किर्तन होईल. दररोज सकाळी 11.30 वाजता नैवैद्य आरती होईल. दररोज सांयकाळी 7 वाजता विष्णुसहस्त्रनाम तथा मंत्र जागर होईल. 4 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता होमहवन सुरू होईल. 5 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता देवीची पालखी सिमोल्लंघनास निघेल. भक्तांसाठी दररोज महाप्रसादही राहणार आहे. नवरात्रोत्सवात दोन्ही देवीच्या दर्शनला भक्तांची अलोट गर्दी असते. यात्राही भरते. त्यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. मंदिर परिसरातले वाहतुकीचे सर्वच मार्ग बंद करण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे.