जाफ्राबाद रोडची तात्काळ दुरुस्ती करा

- मनसेचा आंदोलनाचा इशारा

    दिनांक :25-Sep-2022
|
चिखली, 
जाफ्राबाद रस्ता (Jaffrabad Road) राज्य महामार्ग 228 या रस्त्याचे विशेष दुरुस्ती अंतर्गत पानगोळे हॉस्पिटल ते रानवारा हॉटेल पर्यंतच्या 2.2 किलोमीटर अंतरा रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम नुकतेच पुर्ण झाले असून सदर काम होऊन दोन महिने सुद्धा उलटले नाही तोच रस्ता जैसे थे झालेला आहे. अमाप स्वरूपाची रक्कम 3.5 कोटी रुपये पेक्षा जास्त खर्च करून सुध्दा पहिल्याच एक दोन पाण्यात रक्षा अक्षरशः खरडून निघाला असून रस्त्यावर खड्डे पडले आहे. सदर रस्ता कामांमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे.
 
Jaffrabad Road
 
यापूर्वी सुद्धा मनसेच्या वतीने दि. 10 डिसेंबर 2021 रोजी उपविभागीय अधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभाग चिखली यांना निवेदन दिले होते. त्यामध्ये सुद्धा रस्त्याचे काम निकृष्ट स्वरूपाचे होत असल्याचे मनसेने लक्षात आणून दिले होते व रस्ता योग्य रीतीने उत्कृष्ट स्वरूपाचा बनवा अशी मागणी वेळोवेळी केली. परंतु कंत्राटदाराने रस्ता हा फक्त नावालाच बनविला असून रस्ता पूर्वीप्रमाणे जशास तसा कायम आहे. तरी सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा मनसेच्या वतीने रस्त्यात रोडगे भाजून आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार यांनी दिला. त्यावेळी उपतालुकाध्यक्ष संदीप नरवाडे, तालुका सचिव प्रवीण देशमुख, उपशहर अध्यक्ष रवी वानखेडे, विभाग अध्यक्ष समाधान मस्के, विभाग अध्यक्ष शरद कळमकर, विभाग अध्यक्ष निशांत गायकवाड, शाखाध्यक्ष वैभव पडघान, विभाग अध्यक्ष मंगेश उगले, वैभव देहाडराय, राहुल परमेश्वर, गणेश कळमकर यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.