कंटनरने दुचाकीला उडवले युवक जागीच ठार , एक जखमी

- वाहनचालक फरार

    दिनांक :25-Sep-2022
|
बुलडाणा, 
भरधाव कंटेनरने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरूणाचा जागीच मृत्यू (Youth killed) झाला.तसेच एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. बुलडाणा शहरातील चिखली रोडवर आज 25 सप्टेंबर रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास हा अपघात झाला.
 
Youth killed
 
बुलडाणा शहरातील भीमनगर भागातील राहणारा सुमेध कहाळे (22) असे अपघाताता ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तो आईवडिलांना एकुलता एक होता सुमेध दुचाकीने चिखलीकडून बुलडण्याकडे येत होता. दरम्यान चिखली रोडवरील रविकांत तुपकर यांच्या जनसंर्पक कार्यालयाजवळ पाठीमागून येणार्‍या कंटेनरने दुचाकीला धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की सुमेधचा मेंदूच बाहेर पडला हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली दरम्यान अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनरचा चालक घटनास्थावर कंटेनर उभा करून फरार झाला या रोडवर असणारे सिमेंट दुभाजक कंटेनरच्या धडकेने निघाले. कंटेनर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून पुढील कारवाई पोलिस करत आहे.