सेलूत विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत सोळाशे खेळाडू धावले

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
सेलू, 
Marathon : स्व. भीमबहादुर उर्फ गजू ठाकूर व जयेश रणनवरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सूर्यधरम स्पोर्टिंग क्लब सेलू व वरुणभाऊ दफ्तरी मित्र परिवार सेलू यांच्या संयुक्त वतीने आयोजित विदर्भस्तरीय दौड स्पर्धेत विदर्भातील 1600 धावपटू धावले. स्पर्धेचे उद्घाटन युवा उद्योजक वरुण दफ्तरी यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. रामप्रसाद लिल्हारे, राजेश जयस्वाल, हनिप सय्यद, डॉ. दिलीप जयस्वाल यांनी केले तर बक्षीस वितरण प्रसंगी शैलेंद्र दफ्तरी, सुरेश जयस्वाल, सेलूच्या नगराध्यक्ष स्नेहल देवतारे आदींची उपस्थिती होती.
  
Marathon
 
स्पर्धा 9 गटात आयोजित करण्यात आली होती. मुलांच्या खुला गट 7 किलोमीटर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक लिलाराम बावणे भंडारा, द्वितीय सनी फसाटे वर्धा, तृतीय दिलीप सोनवणे नागपूर, खुला गट मुली 5 किमी प्रथम प्राजक्ता गोडबोले नागपूर, द्वितीय आकांक्षा शेलार नागपूर, तृतीय प्राची गोडबोले नागपूर यांनी प्राप्त केला. 19 वर्षाखालील मुलांच्या गटात 5 किमी धावणे प्रथम प्रणय माहुले, द्वितीय आदित्य भुरसे व तृतीय अभिषेक बावने हे तिन्ही नागपूर. 16 वर्षातील मुली 3 किमीमध्ये प्रथम मधुरा पहाडे वर्धा, द्वितीय आस्था निबोते, तृतीय वेदिका वाघरे नागपूर तर 14 वर्षाआतील मुले प्रथम नमन अवचट नागपूर, द्वितीय आदित्य नागेश्वर नागपूर, तृतीय शशांक सहारे नागपूर,
 
 
2 किमी मुली प्रथम तन्मय पिंपळकर नागपूर, द्वितीय जानवी बावणे नागपूर, तृतीय काजल चौधरी वर्धा, 10 वर्षाआतील मुलीमध्ये प्रथम क्रमांक यशस्वी राठोड सूर्यधरम स्पोर्टिंग क्लब सेलू, द्वितीय नंदनी सावरकर सूर्यधरम स्पोर्टिंग क्लब सेलू तृतीय क्रमांक रवी बोरकर वर्धा, 10 वर्षाखालील मुले प्रथम रोशन ठाकरे चंद्रपूर, द्वितीय काव्या बिसेन सूर्यधरम स्पोर्टिंग क्लब सेलू, तृतीय मयंक राहांगडाले सूर्यधरम स्पोर्टिंग क्लब सेलू तर अग्निविर सैन्यभरती 1600 मीटर धावणे प्रथम वैभव खूरसाने वर्धा, द्वितीय प्रयास कोल्हे सूर्यधरम स्पोर्टिंग क्लब सेलू, तृतीय मनीष पाठे यांनी पटकावला. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या मार्गदर्शकाचा सत्कार करण्यात आला. संचालन अनुष्का मुडे यांनी केले तर आभार सागर राऊत यांनी मानले.