संवादात अबाधित चैतन्य हवे

- गायत्री खरे यांचे प्रतिपादन
-तरुण भारत सुसंवाद कार्यशाळा

    दिनांक :25-Sep-2022
|
नागपूर, 
विविध प्रकारे संवाद साधताना संवादातील चैतन्य communication अबाधित रहायला हवे असे उद्गार समुपदेशक गायत्री खरे यांनी काढले. तरुण भारततर्फे आज ‘‘मनातलं बोलू काही’’ या उपक‘माअंतर्गत सुसंवाद कार्यशाळेच्या दुसर्‍या सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रीनरकेसरी प्रकाशनाच्या संचालिका सौ. मीरा कडबे व्यासपीठावर उपस्थित होत्या.
 

hg  
 
सुसंवाद कार्यशाळेच्या दुसर्‍या सत्रात गायत्री खरे बोलत होत्या. communication संवाद साधताना आपल्या प्रकृतीचा काय सहभाग असतो? त्यामुळे आपल्या संवाद करण्याच्या पध्दतीवर व पर्यायाने आपल्या नात्यांवर, नोकरी किंवा व्यवसायावर याचा काही परिणाम होतो का? थोडक्यात सुसंवाद जर विसंवाद होत असेल तर ? याच प्रश्नाच्या उत्तरासाठी वाद म्हणजे विचार, संवाद म्हणजे समविचार. याच समविचाराचे कुटुंब, मित्रपरिवार किंवा समाजात वावरताना आदानप्रदान व्हायला हवे. संवादातून उमटणार्‍या भावना परस्परांना जोडतात. संवादात श्रवण करणारा व व्यक्त होणारा असे दोन महत्वाचे घटक असतात. सांगणारा जसा आपल्या बोलण्यातून रिक्त होत असतो तद्वतच ऐकणार्‍याचीही भूमिका त्याला अनुसरुन सौम्य व विश्वासू हवी, असे प्रतिपादन खरे यांनी केले. लॉकडाऊन काळातही संवाद होता फक्त त्याचे स्वरुप वेगळे होते. तो मॅसेजेस, ऑडीओ व्हीडीओ कॉल या माध्यमातून होत होता. संवाद साधताना व्यवस्थित नियोजन हवे. देहबोलीतून आधार, विश्वास, बांधीलकी जपायला हवी. कारण ज्या व्यक्तीला संवादाची गरज असते तो सुध्दा व्यक्त होण्याआधी नकळत सोबतच्या व्यक्तीला पारखत असतो.
 
 
स्वसंवाद, परस्पर संवाद, गट संवाद, communication संस्कृती संवाद, भावनिक संवाद अधिक उत्तमरितीने उलगडण्यासाठी उपस्थित श्रोत्यांना काही उपक‘म देण्यात आले. वय वाढत जाताना आपण कुठेतरी हरवत जातो, विचलीत होतो तेव्हा आवश्यक मन:शांतीसाठी पावलं आपोआप मंदीराकडे वळतात. तेथील पवित्र वातावरणात आपल्याला उर्जा संवादाची अनुभूती येते.नम‘पणे झुकणे, समर्पित होणे, सभ्य प्रामाणिकपणे वावरणे हे संवाद संस्कारातील पैलू प्रत्येकाने आत्मसात करायला हवे, असे उद्गार मीरा कडबे यांनी काढले. सूत्रसंचालन रेवती जोशी- अंधारे यांनी केले.