खरिपावरील संकटांची मालिका संपता संपेना

    दिनांक :25-Sep-2022
|
मानोरा, 
Kharipa तालुक्यात पन्नास टक्केपेक्षा अधिक पेरा असलेल्या व काढणीस आलेले सोयाबीनचे पीक संकटाच्या मालिकेने घेरले आहे. सोयाबीन पिकावर वन्य प्राण्यांच्या टोळधाडींना शेतकर्‍यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र गावोगावी पहायला मिळत आहे. जून महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्याने लांबलेल्या पेरणीमुळे अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये बियाण्याची खरेदी करून पेरणी केलेल्या शेतकर्‍यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये व या महिन्याच्या पूर्वार्धात सुद्धा काही प्रमाणात अतिवृष्टीला सामोरे जावे लागून अपेक्षित उत्पन्नाच्या घटीला सामोरे जावे लागणार आहे.
  
nnhya
 
तालुक्यातील वनविभागाच्या जवळ असो अथवा वन जमीन नसलेल्या Kharipa गावांच्या शेतशिवार सुद्धा रोही, रानडुकरांच्या कळपांच्या टोळधाडीला रात्रंदिवस सामोरे जावे लागून त्याचा परिणाम पीक नुकसानीच्या स्वरूपात भोगावे लागत आहे. मानोरा तालुक्यातील आसोला, माहुली, आमदरी, शिवनी या व इतर गावातील शेतकर्‍यांचे मुख्य पीक असलेल्या सोयाबीनला माकडांच्या कळपांनीही निशाण्यावर घेतले आहे. १५ ते २० संख्या असलेल्या माकडांच्या झुंडी परिपक्व झालेल्या सोयाबीनच्या शेंगांची पूरती वाट लावत असल्याचे चित्र आहे. एका शेतकर्‍याने आपल्या शेतातून त्यांना हुसकावल्यास ते दुसर्‍या शेत शिवारात जाऊन सोयाबीनचा धिंगाणा करीत असल्याने असंख्य शेतकर्‍यांना दर दिवशी हताशपणे उघड्या डोळ्याने झालेल्या नुकसानीला पाहण्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नसल्याच्या भावना यानिमित्ताने बाधित शेतकर्‍यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.